Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याChandrashekhar Bawankule: "...तर ईट का जवाब पत्थर से देऊ"; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना...

Chandrashekhar Bawankule: “…तर ईट का जवाब पत्थर से देऊ”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

नागपूर | Nagpur

काल ठाकरे गटाचे प्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या हिंगोलीमधील निर्धार सभेत केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जुन्या वक्तव्याचा संदर्भ देत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा डिवचल्याचे पाहायला मिळाले होते.

- Advertisement -

Sanjay Raut : ‘इंडिया आघाडी’चा लोगो कसा असणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते आज सकाळी सोमवार (दि. २८) रोजी नागपुरात (Nagpur) पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला वाटतं की महाराष्ट्र शांत रहावा. महाराष्ट्रात कोणती अनुचित घटना घडू नये. महाराष्ट्रात आमचं सरकार असल्याने कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये, असं वाटतं. पंरतु, जर त्यांनी मर्यादा ओलांडली तर भारतीय जनता पक्ष आपली मर्यादा सोडेल. त्यांनी भाग पाडलं तर मुंबईत मात्र ‘ईट का जवाब पत्थर से’ देऊ, असे बावनकुळेंनी म्हटले.

Neeraj Chopra : “मी स्वत:ला…”; सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी कुणाला इशारा देऊ इच्छित नाही, पण ते लोक ज्या पद्धतीने वागत आहे, ते त्यांनी सोडावे. मुख्यमंत्रिपदाची धुरा सक्षमपणे सांभाळत इतिहासात नोंद होईल, असे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आणि महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या मनात जी उंची गाठली आहे, ती उंची कधीच कमी होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे जन माणसातून मोठे झाले नाही तर सोन्याच्या चमच्याने बदामाचे दूध पिऊन मोठे झालेले आहेत. अडीच वर्षे सरकार चालवून देवेंद्र फडणवीसांसारखी उंची मी गाठू शकलो नाही असे उद्धव ठाकरे यांना वाटत असेल म्हणून गलिच्छ भाषेत, खालच्या स्तरावर जाऊन ते फडणवीसांबाबत बोलत आहेत. असं करून त्यांची उरली सुरली उंचीही ते कमी करून घेत आहेत, असेही बावनकुळे यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal : बीडमध्ये भुजबळांवर भाषण आवरतं घेण्याची वेळ, नेमकं काय घडलं?

ते पुढे म्हणाले की, तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचा जेवढा अपमान कराल ते नेतृत्व तेवढेच मोठे होत जाणार. ज्या देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना भावाप्रमाणे प्रेम दिले त्यांना हवे ते निर्णय करून दिले. मात्र सरकार गेल्याने सैरभैर झालेल्या उद्धव ठाकरे ना माहीत आहे की ते पुन्हा आता कधीच सत्तेत येणार नाहीत, त्यामुळे ते देवेंद्र फडणीस यांच्याबद्दल अशा पद्धतीने बोलत आहेत. आता एखाद्या वेळी एवढा मोठा उद्रेक होईल की मुंबईमध्ये त्याचे पडसाद उमटतील आणि आम्हीही ते रोखू शकणार नाहीत. त्यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संभाजीराजेंचे मोठं विधान म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या