Saturday, September 21, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर?; पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट,...

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर?; पंकजा मुंडे यांची बदनामी करण्यामागे भाजपचाच एक गट, बावनकुळेंचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडून पंकजा यांना डावलले जात असल्याची चर्चाही अनेकदा झाली होती.

मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबत मोठा खुलासा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याचे षडयंत्र भाजप नेत्यांकडून रचले जात असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

ATM फोडनं सुरू होतं, चोरांचा प्लॅन यशस्वी होत आला होता, पण जीव वाचवत पळावं लागलं… संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं?

बीडमधील कार्यक्रमातील स्टेजवरील व्हायरल व्हिडीओवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंकजाताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला होता. कारण पंकजा मुंडे या आमच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. त्यामुळे या कृतीने त्यांचा अपमान झाला असे समजणे हे हस्यास्पद आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

तसेच पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडेंना आणि पक्षाला बदनाम करत आहेत. भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारं एक गट आहे. तेच हे काम करत आहे. कोणीतरी हे जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी कबुलीच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

दरम्यान, पंकजा मुंडे खरंच नाराज आहेत? या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळेंनी याआधीही प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांच्याशी परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठिक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. एखाद्या कार्यक्रमाला एखादा नेता उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येक नेत्याची व्यस्तता वेगळी असते. आज देवेंद्र फडणवीस बीडमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून गेले आहेत. त्या कार्यक्रमाला एखादा आमदार नसेल तर त्याने दांड मारली असे म्हणायचे का?

तसेच, एक नेता गेल्यानंतर दुसरा नेता हजर राहणे गरजेचे आहे का? एकाच कार्यक्रमाला चार-पाच नेत्यांना अडकवून कशाला ठेवायला हवे. त्यापेक्षा वेगवेगळे कार्यक्रम केलेले कधीही चांगले. कोणताही वेगळा अर्थ काढू नये. पंकजा मुंडे या नेत्या आहेत. त्यांचेही वेगळे कार्यक्रम आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

यावेळी त्यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. निवडणूक आयोगावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. परंतु आदित्य ठाकरे यांना एवढी घाई का आहे हे मला माहीत नाही? निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे. त्यामुळे निवडणूक आयोग एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत असेल तर आयोग निर्णय करेल आणि तो निर्णय सर्वानीच मान्य केला पाहिजे. आदित्य ठाकरेंनी एवढी घाई करू नये. सत्याचा विजय होईल. परंतु, सत्य काय? हे १२ कोटी जनतेने बघितले आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

बेईमानी करणे तुमच्या रक्तातच आहे. बेईमानी करून तुम्ही सत्ता मिळवली होती. त्यामुळे खरे सत्य काय आहे हे निकाल आला की तुम्हाला माहिती पडेलच. घटनाबाह्य सरकार उद्धव ठाकरे यांनी स्थापन केले होते. भाजपसोबत युती करून निवडून आले. एवढीच हिंमत होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार बनवताना आमदारकीचे राजीनामे देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जायला हवे होते. निवडून आल्यानंतर सरकार स्थापन करायचे होते. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली म्हणून शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. मात्र बेईमानी करून सत्ता मिळवली होती. मात्र आताचे शिंदे-फडवणीस यांचे सरकार नियमाने आलेले सरकार आहे. तसेच हे सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे, असेही ते म्हणाले.

सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राख

- Advertisment -

ताज्या बातम्या