Sunday, September 8, 2024
Homeराजकीयउद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी, देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय...

उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी, देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केलं जातंय – बावनकुळे

पुणे | Pune

भाजपचे पुण्यातील बालेवाडीत राज्यातील पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उपस्थित भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सदर अधिवेशनाला महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. यावेळी अधिवेशनास उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मार्गदर्शन करतांना मराठा आरक्षणाच्या वादावर भाष्य करत उद्धव ठाकरेचं मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलं जातं आहे, अशी टीका केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली; शिंदे गटातील इच्छुकांचा हिरमोड

यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, राज्यात भाजप-शिवसेना युतीचे (Shivsena Bjp Yuti) सरकार असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी २० रात्र जागून मराठा आरक्षण देणारा कायदा केला.विधीमंडळात तो एकमताने मंजूर करण्यात आला. हायकोर्टाने देखील या कायद्याला मंजूरी दिली. पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आणि कमजोर आहे, त्यामागचा भाग सुप्रीम कोर्टात मांडला नाही. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

हे देखील वाचा : मैदानात उतरा आणि ठोका, अट फक्त एकच…; फडणवीसांचा पदाधिकाऱ्यांना ‘फ्री हँड’

त्याबरोबरच उद्धव ठाकरेंनी जर चार चांगले उच्चस्तरीय वकील दिले असते तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न त्याच दिवशी संपला असता. मात्र, उद्धव ठाकरेंनी चार चांगले वकील न दिल्यामुळे आज मराठा आरक्षणाची ही परिस्थिती आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) मारेकरी असून सामाजिक आंदोलनाच्या नावाने देवेंद्र फडणवीसांना व्हिलन केले जात आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हे देखील वाचा : अखेर तो क्षण आलाच! ‘मी अजित आशा अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…’

तसेच मराठा समाजाला १०० टक्के आरक्षण मिळावे, त्यांना हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे याकरता भारतीय जनता पार्टी, महायुती पाठिंबा देत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पर्याय शोधत असताना दुसरीकडे देवेंद्रजींच्या काळात कायदा (Low) केला होता, त्या कायद्याचा मारेकरी शोधला पाहिजे. हेही करण्याची गरज आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या