Wednesday, September 11, 2024
Homeनगरमोदी तिसर्‍यांदा शपथ घेतील तेव्हा खा. विखे..; काय म्हणाले बावनकुळे वाचा सविस्तर

मोदी तिसर्‍यांदा शपथ घेतील तेव्हा खा. विखे..; काय म्हणाले बावनकुळे वाचा सविस्तर

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पंतप्रधान जेव्हा तिसर्‍यादा पंतप्रधान पदाची व भारत देश आत्म निर्भर बनवण्याची शपथ घेतील. तेव्हा महाराष्ट्रातून भाजपाचे 45 खासदार निवडून गेलेले असले पाहिजे व त्यात नगर दक्षिणचे खासदार डॉ.सुजय विखे सर्वाधिक मतांनी विजयी झालेले असले पाहिजेत, असे आवाहन भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुपा येथे केले.

- Advertisement -

जल संवाद यात्रेच्या निमित्ताने ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियाना अंतर्गत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रविवारी अहमदनगर जिल्हा दौर्‍यावर आले असता पारनेर भाजपा कार्यकर्त्यांनी बावनकुळे याचे अहमदनगर-पुणे महामार्गावर ठिकठिकाणी व सुपा बस स्थानक चौकात जोरदार स्वागत केले. सुपा बस स्थानक चौकात जेसीबी मशिनच्या साह्याने फुलाची उधळण करत फटाक्याच्या आतषबाजीत भव्य स्वागत करण्यात आले.

यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, जिल्हाअध्यक्ष दिलीप भालसिंग, उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, माजी अध्यक्ष सुनील थोरात, वसंत चेडे, दिनेश बाबर, प्रसाद शितोळे यांच्यासह तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष बावनकुळे म्हणाले, मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखा आपल्या घरोघरी पोहचवायचा आहे. शहिदांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्लीत स्मारक उभारले जात आहे. यासाठी देशभरातून माती एकत्र केली जात आहे.

ना. विखेंबरोबर 12 आमदार विधानभवनात पाठवा

राधाकृष्ण विखे जेव्हा विधानभवनात जातील तेव्हा त्यांच्याबरोबर अहमदनगरचे 12 आमदार असले पाहिजेत. तेव्हा कार्यकर्त्यांनी वेळ काढून मतदारांच्या घरोघरी जाऊन मोदी सरकारच्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यापर्यंत पोहचला पाहिजे, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या