दिल्ली | Delhi
चांद्रयान-३ चंद्रावर कधी पोहोचणार याची प्रतीक्षा सर्व भारतीयांना आहे. येत्या काही दिवसात चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. सध्या इस्रोने चांद्रयान-३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत आणले आहे. आता चांद्रयान १७४ किमी x १४३७ किमीच्या लहान लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. मात्र इस्त्रोने याला अद्याप दुजोरा दिलेला नाहीये. ५ ऑगस्ट २०२३ रोजी, जेव्हा चांद्रयान-३ चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर त्याने चंद्राचे फोटो प्रसिद्ध केले होते.
इस्त्रोने ९ ऑगस्ट दुपारी एक वाजून ४० मिनिटांनी चांद्रयान-३ च्या कक्षेमध्ये बदल केला. म्हणजेच चांद्रयान-३ च्या थ्रस्टर्सना ऑन करण्यात आले. ५ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान-३ चंद्राच्या पहिल्या कक्षेत पोहचले होते. तेव्हा चांद्रयानाने चंद्राचा पहिला फोटो देखील प्रसिद्ध केला होता. तेव्हा चांद्रयान-३ चंद्रा भोवती १९०० किलोमीटर प्रति सेकंद इतक्या वेगाने १६४ X १८०७४ किमी लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होते. ज्याला ६ ऑगस्ट २०२३ रोजी कमी करून १७० x ४३१३ किमी कक्षेत पोहचले होते. म्हणजेच चांद्रयान-३ ला दुसऱ्या कक्षेत पोहचवण्यात आलं होतं.
आता १४ ऑगस्ट रोजी चंद्रयान चौथ्या कक्षेत प्रवेश करणार आहे. १६ ऑगस्टला सकाळी ८.३८ ते ८.३९ दरम्यान पाचव्या कक्षेत प्रवेश करेल. १७ ऑगस्टला चांद्रयान-३ चे प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे होतील. त्याच दिवशी, दोन्ही मॉड्यूल चंद्राभोवती १०० किमी x १०० किमीच्या वर्तुळाकार कक्षेत असतील. १८ ऑगस्ट रोजी लँडर मॉड्यूलचे डीऑर्बिटिंग दुपारी ४.४५ ते ४ दरम्यान होईल. म्हणजेच त्याच्या कक्षेची उंची कमी होईल. २० ऑगस्ट रोजी चांद्रयान-३ चे लँडर मॉड्यूल रात्री १.४५ वाजता डि-ऑर्बिटिंग करेल. २३ ऑगस्ट रोजी लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरेल. जर सर्व काही ठीक झाले तर लँडर ६.३० वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.