Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याChandrayaan 3 : चंद्रयान-३ उड्डाणासाठी सज्ज! 'ही' आहेत माेहिमेची खास वैशिष्ट्ये, जाणून...

Chandrayaan 3 : चंद्रयान-३ उड्डाणासाठी सज्ज! ‘ही’ आहेत माेहिमेची खास वैशिष्ट्ये, जाणून घ्‍या सविस्‍तर

भारताच्या चांद्रयान-३ या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल. ६ सप्टेंबर २०१९ च्या पहाटे चंद्रावर लँडर व रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-२ मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. त्यामुळे भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रोपल्शन मॉड्यूल १०० किमी चंद्राच्या कक्षेपर्यंत लँडर आणि रोव्हर घेऊन जाईल. चांद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल, प्रोपल्शन मॉड्यूल आणि रोव्हर यांचा समावेश आहे. त्याच्या उद्दिष्टांमध्ये आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्यांचे प्रात्यक्षिक करणे समाविष्ट आहे. लँडरमध्ये चंद्राच्या विशिष्ट जागेवर उतरण्याची आणि रोव्हर तैनात करण्याची क्षमता असेल, जे त्याच्या गतिशीलतेदरम्यान चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक विश्लेषण करेल. चंद्राच्या पृष्ठभागावर प्रयोग करण्यासाठी लँडर आणि रोव्हरमध्ये वैज्ञानिक पेलोड असतील.चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची योजना आहे. चांद्रयान ३ च्या साहाय्याने चंद्रावर वैज्ञानिक उपकरणं पाठवून त्याच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईल. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमेच्या दृष्टीने ही मोहिम फार महत्त्वाची आहे.

- Advertisement -

चंद्रावर चांद्रयान उतरवण्याच्या या मोहिमेची जबाबदारी रितू कारिधाल सांभाळत आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील रितू कारिधाल, ज्यांना भारताची रॉकेट वुमन म्हणून ओळखले जाते, अंतराळ क्षेत्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव पाहता, इस्रोने रितू यांना चांद्रयान-३ चे मिशन डायरेक्टर बनवले आहे. याआधी त्या चांद्रयान-२ सह अनेक मोठ्या अंतराळ मोहिमांचा भाग राहिल्या आहेत, विशेष म्हणजे रितू कारिधाल या त्या वैज्ञानिकांपैकी एक आहे ज्यांना इस्रोचा यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला आहे. रितू कारिधाल या मूळच्या लखनौच्या असून, त्यांचे निवासस्थान राजाजीपुरम येथे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या