Sunday, May 26, 2024
Homeदेश विदेशChandrayaan 3 Update : 'चांद्रयान-३'चा आणखी एक टप्पा पूर्ण!

Chandrayaan 3 Update : ‘चांद्रयान-३’चा आणखी एक टप्पा पूर्ण!

दिल्ली | Delhi

इस्रोकडून १४ जुलै रोजी भारतातर्फे चांद्रयान ३ अवकाशात पाठवण्यात आलं. चंद्रावरील पाणीसाठा आणि तिथं येणारा भूकंप या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याच्या हेतूनं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं ही मोहिम हाती घेतली. पाहता पाहता पहिल्या क्षणापासून या मोहिमेत एक एक टप्पा यशस्वीरित्या सर झाला आणि आता चांद्रयान ३ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. १४ ऑगस्ट रोजी इस्रोनं चांद्रयानाची कक्षा आणखी कमी केली असून, आता या यानाचा कठीण आणि आव्हानात्मक प्रवास सुरु झाल्याची माहिती दिली.

- Advertisement -

इस्रोने ट्वीट करत म्हटलं की, ‘चांद्रयान-३ चंद्राच्या दिशेने आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. चांद्रयान चंद्राच्या जवळच्या कक्षेत पोहोचलं आहे. १६ ऑगस्ट रोजी चांद्रयान चंद्राच्या आणखी या जवळ पोहोचेल. इस्रोने यापूर्वी एक पोस्ट देखील पोस्ट केली होती की, १४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० ते १२.३० च्या दरम्यान शेवटची परिक्रमा केल्यानंतर भारताचे चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ पोहोचेल. सध्या चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागापासून १४३७ किमी अंतरावर आहे.

चांद्रयानच्या यशस्वी लँडिंगसह भारत, अमेरिका सोवियत संघ आणि चीन यांच्यानंतर हे पराक्रम करणारा चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान-३ चा मार्ग हा चांद्रयान २ प्रमाणेच असणार आहे. यामध्ये देखील तीन फेज असणार आहेत – अर्थ ऑर्बिट मन्युव्हर, ट्रान्स लूनर इंजेक्शन आणि लूनर मन्युव्हर. इस्त्रोने ९ ऑगस्ट रोजी दुपारी चांद्रयान ३ ची कक्षा यशस्वीरित्या कमी केली होती. यामुळे चांद्रयान-३ चंद्राच्या आणखी जवळ पोहचले होते. यानंतर आता १७ ऑगस्टला चांद्रयान चंद्रापासून १०० किलोमीर उंचीवर स्थिरावेल. नंतर २३ ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या