Thursday, July 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूज२३ जानेवारीला होणाऱ्या 'सूर्यकिरण' एअर शोच्या वेळेत बदल - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

२३ जानेवारीला होणाऱ्या ‘सूर्यकिरण’ एअर शोच्या वेळेत बदल – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक | जिमाका वृत्तसेवा

- Advertisement -

कमी दृश्यमानता (Low Visibility) लक्षात घेता शुक्रवार २३ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘सूर्यकिरण’ (SKAT) एअर शोच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आता दुपारी 12 वाजता सुरुवात होणार आहे. प्रेक्षकांना कार्यक्रमस्थळी सकाळी ११ वाजेपासून प्रवेश खुला केला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

ज्या प्रेक्षकांनी आपली आसन व्यवस्था राखीव केली आहे, त्यांनी प्रवेश प्रक्रिया व आसन व्यवस्थेची सुरळीत अंमलबजावणी होण्यासाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे. तसेच प्रेक्षकांनी स्वतःच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, टोपी व सनग्लासेस सोबत ठेवावेत. कार्यक्रमस्थळी सुरक्षा तपासणी तसेच आपत्कालीन सेवांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे.

भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचे चित्तथरारक प्रात्यक्षिक प्रेक्षकांना स्पष्टपणे पाहता यावे, या उद्देशानेच कार्यक्रमाच्या वेळेत बदल करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातील साठा ‘किती’ टक्क्यांवर; मुळा धरणही निम्मे भरण्याच्या मार्गावर

0
भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात मंगळवारनंतर बुधवारीही आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा धरणातील पाणीसाठा काल...