Friday, March 28, 2025
Homeनाशिकनाशिकमध्ये मतमोजणीदिवशी वाहतूक मार्गात बदल, पार्किंगचीही स्वतंत्र व्यवस्था

नाशिकमध्ये मतमोजणीदिवशी वाहतूक मार्गात बदल, पार्किंगचीही स्वतंत्र व्यवस्था

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीकरिता वाहतूक उपायुक्त कार्यालयाने वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. अंबड वेअर हाउसकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.४) पहाटे ४ वाजेपासून रात्री दहापर्यंत रस्त्यांवर निर्बंध असणार आहेत.

- Advertisement -

जिल्हा निवडणूक अधिकारी, त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या ज्या वाहनांना परवानगी आहे, त्यांना सदर निर्बंध लागू नसतील. पोलिस सेवेतील, अग्निशमन दलाची वाहने यांनाही नियमांतून सूट असेल. दरम्यान, उमेदवार-कार्यकर्त्यांसाठी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यानुसार महायुतीसाठी चुंचाळे पोलसिस चौकी शेजारील जागा, पाथर्डी फाटा-गरवारेमार्गे चुंचाळे चौकी. तर, महाविकास आघाडीसाठी अंबड पॉवर हाउसमोरील जागा व पाथर्डी फाटा- सिडको हॉस्पिटलमार्गे येता येईल. अंबड गा- वातून पॉवर हाउस. यासह इतर व अपक्षांसाठी फिनोटेक्स कंपनी, नेक्सा शोरुमसमोर पाथर्डी फाटा-सिडको हॉस्पिटल-फ्रेशअप बेकरीमार्गे जाता-येता येईल.

प्रवेश बंद मार्ग

जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेड ते अंबड वेअर हाउसपर्यंत
अंबड वेअर हाउसपासून पॉवर हाउस
ग्लॅक्सो कंपनी ते संजीवनी नर्सरीकडे अवजड वाहतुकीला प्रवेश बंद
अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे वाहनांना प्रवेश बंद

पर्यायी मार्ग

जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेडकडून गरवारेमार्गे इतरत्र
गरवारेवरुन एक्स्लो पॉइंटमार्गे इतरत्र
अंबड गावाकडून अजिंठा हॉटेलमार्गे एक्स्लो पॉइंटकडून इतरत्र

अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे.

चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, वाहतूक


YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुनावणी संपताच कोर्टात राडा; प्रशांत कोरटकरवर वकिलाचा हल्ला, पोलीसांनी हल्लेखोराला पकडलं

0
कोल्हापूर | Kolhapurइतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापूर न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न...