Saturday, July 27, 2024
Homeनाशिकआगामी निवडणुकीत बदल घडवायचा : पटोले

आगामी निवडणुकीत बदल घडवायचा : पटोले

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळी भाजप व संघ परिवाराने त्यांच्यावर चिखल व शेणफेक केली. आजही त्यांच्यावर ते टीका करत आहेत. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार असताना डिझेल, पेट्रोल दरवाढीचा, महागाईचा भार सामान्यांनावर कधीही पडू दिला नाही. आज भाजप सरकारमुळे देशात कृत्रिम महागाई निर्माण झाली आहे. त्याचा सर्वात मोठा फटका महिला वर्गाला बसत आहे. या सर्व व्यवस्थेत आपल्याला आगामी निवडणुकीत बदल करायचा आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

- Advertisement -

आदिवासी तडवी भिल्ल समाजातर्फे आंबेडकरनगर येथे जागतिक आदिवासी दिन व तडवी समाजाचा मेळावा झाला. त्यावेळी पटोले बोलत होते. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, माजी मंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी नगरसेविका आशा तडवी, राहुल दिवे, हेमलता पाटील, वत्सला खैरे, जिल्हा प्रभारी राजु वाघमारे, ब्रिजकिशोर दत्त, देवानंद पवार, स्वाती जाधव, वंदना पाटील, पल्लवी रनके, डॉ. तुषार शेवाळे, जेसाभाई मोटवाणी, बादल गायकवाड, हानीफभाई बशीर, संतोष ठाकूर आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, भाजप सरकारने दोन कोटी लोकांना रोजगारासारखी खोटी आश्वासन देत सत्ता मिळवली. नंतर शेतक-यांना संपवले, महागाईचा डोंगर चढवला. पुलवामा घटनेचे भांडवल करून हे सरकार केंद्रात आले. भारताचा एक भाग जळतोय, महिलांवर अत्याचार होत आहेत तरी पंतप्रधान मोदी गप्प आहेत. आसाममध्ये अशी परिस्थिती असताना राजीव गांधी यांनी कौशल्याने ती हाताळून शांतता निर्माण केली. केंद्रातील भाजप सरकारमुळे देशाची अखंडता धोक्यात आली आहे. जातीयतेढ वाढला आहे. आगामी निवडणुकीत ही व्यवस्था आपल्याला एकजूटीने बदलायची आहे.

संध्या सव्वालाखे यांनीही मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे महिला शिक्षित होऊन मुख्य प्रवाहात आल्या आहेत. आदिवासी महिलांनी पारंपारिक व सांस्कृतिक संस्कृती जपली आहेत, असे त्या म्हणाल्या. राहुल दिवे यांनी यांनी प्रास्ताविक तर आशा तडवी यांनी सूत्रसंचालन केले. नुरा तडवी, नासेर तडवी, जावेद तडवी, मुस्कान आबिद, दिलदार तडवी, दिलीप तडवी, सिंकदर तडवी, शरिफ सलीम, हलीमा जाहबाज, सायरा रशिद, जैनुर जहागीर, मीना छब्बीर आदींनी संयोजन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या