Friday, June 6, 2025
HomeनाशिकNashik News: बकरी ईद निमित्ताने शहरातील वाहतूक मार्गात बदल

Nashik News: बकरी ईद निमित्ताने शहरातील वाहतूक मार्गात बदल

नाशिक । प्रतिनिधी
बकरी ईद निमित्ताने शनिवारी (दि. ७) नाशिक शहरात ईदगाह मैदान येथे नमाज पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, याकरिता सकाळी ७ ते १२ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्याबाबत पोलीस उपायुक्त मुख्यालय व वाहतूक शाखा चंद्रकांत खांडवी यांनी परिपत्रक जारी केले आहे.

- Advertisement -

बंद मार्ग
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा ते जलतरण तलाव सिग्नलपर्यंत जाणाऱ्या-येणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे. गडकरी चौक ते चांडक सर्कलपर्यंत जाणाऱ्या-येणाऱ्या मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस प्रवेश बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यायी मार्ग
त्र्यंबक पोलीस चौकीकडून उजवीकडे वळून, ठाकरे गल्ली, शालीमार व मेनरोड मार्गे चांडक सर्कल, संदीप हॉटेल मार्गे मुंबईनाका मार्गे इतरत्र जातील.

बॅरिकेटिंग पॉईंट
सारडा सर्कल, गडकरी चौक, चांडक सर्कल, सेंट फ्रान्सिस हायस्कूल पॉईंट, जलतरण तलाव सिग्नल, मोडक सिग्नल, अण्णा भाऊ साठे पुतळा, खडकाळी सिग्नल, सीबीएस सिग्नल, मेळा स्टॅण्ड तालुका पोलीस ठाणे समोर, टिळकवाडी सिग्नल. सर्व निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, अग्निशमन दलाची वाहने व रुग्णवाहिका यांना लागू राहणार नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

चिनाब

Chenab Bridge Inaugaration: PM मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच पुलाचे उद्घाटन;...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. ६) जम्मूमधील चिनाब नदीवर बांधलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले. पंतप्रधान...