Friday, May 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजLoksabha Session: राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा राडा; सभापतींवर कागदपत्रे फेकली, आठ...

Loksabha Session: राहुल गांधींच्या भाषणादरम्यान लोकसभेत मोठा राडा; सभापतींवर कागदपत्रे फेकली, आठ खासदारांचं निलंबन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
मंगळवारी संसदेच्या कामकाजादरम्यान, सभागृहाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे प्रकरण समोर आले. लोकसभेत झालेल्या गोंधळादरम्यान, काही खासदारांनी सभापतींवर कागदपत्रे फेकली. यावर कडक कारवाई करत, संबंधित खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. आठ खासदारांवर ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, तसेच हो, हा चीन आणि पाकिस्तानशी संबंधित राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे असे त्यांचे विधान पुन्हा मांडले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यावर आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते सभागृहाच्या दिशा चुकवत आहेत, असे सांगितले. अध्यक्षांच्या बैठकीत झालेल्या चर्चेचा संदर्भ देत रिजिजू म्हणाले, “आम्ही येथे एकतेसाठी आहोत, परंतु त्यांनी विषय सोडून दिला.”

राहुल गांधी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा एकदा नरवणे यांच्या आत्मचरित्राचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांना बोलण्यापासून रोखले जात असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मी विरोधी पक्षनेता आहे, मला बोलू द्या.” पूर्व लडाखमध्ये भारतीय सैनिक मारले, असा उल्लेखही त्यांनी केला. यावेळी लोकसभेत गोंधल निर्माण झाला. या गोंधळावरुन आता आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

दुपारी ३ वाजता लोकसभेचे कामकाज चौथ्यांदा सुरू झाले तेव्हा पीठासीन अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या सदस्यांनी सभापतींवर कागदपत्रे फेकली त्यांची नावे नोंदवली जातील. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी अशा खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला. सभागृहाने आवाजी मतदानाने हा प्रस्ताव मंजूर केला.

या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित केलेल्या खासदारांमध्ये माणिकम टागोर, किरण कुमार रेड्डी, प्रशांत पडोले, हिबी एडन, डीन कुरिया कोसे, एस. वेंकटेशन, गुरजीत सिंग औजला आणि अमरेंद्र सिंग राजा वारिंग यांचा समावेश आहे. या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी एकूण आठ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

0
ओझे | वार्ताहर Oze लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी...