Tuesday, January 6, 2026
Homeनगरनिवडणुक प्रशिक्षणाला उपस्थित असूनही गैरहजेरीची नोटीस; महापालिकेच्या अनागोंदीचा शिक्षकांना फटका

निवडणुक प्रशिक्षणाला उपस्थित असूनही गैरहजेरीची नोटीस; महापालिकेच्या अनागोंदीचा शिक्षकांना फटका

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या निवडणूक तयारीत मोठ्या प्रमाणावर गोंधळ व अनागोंदी समोर आली आहे. निवडणूक प्रशिक्षणाला प्रत्यक्ष उपस्थित राहूनही काही शिक्षकांना अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या या निष्काळजी व विस्कळीत कारभाराचा थेट फटका शिक्षकांना बसत असून, प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेष म्हणजे काही शिक्षकांना निवडणूक ड्युटीचे अधिकृत नेमणूक आदेश (ऑर्डर) न देता थेट प्रशिक्षणास अनुपस्थित राहिल्याची नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसव्दारेच संबंधित शिक्षकांची निवडणूक कामासाठी नेमणूक केल्याचे कळविण्यात आल्याने हा प्रकार अधिकच धक्कादायक ठरला आहे.

YouTube video player

निवडणूकीसाठी प्रथम प्रशिक्षण 29 डिसेंबर 2025 रोजी पार पडले. या प्रशिक्षणाला अनेक शिक्षक प्रत्यक्ष उपस्थित असतानाही त्यांना गैरहजेरीची नोटीस पाठविण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही शिक्षक सेवेत नसताना, काही वर्षांपूर्वी शाळा सोडून गेलेले असतानाही त्यांच्या नावाने संबंधित शाळांना नोटीस पाठविण्याचा प्रताप महापालिका प्रशासनाने केला आहे.

विशेष म्हणजे विना अनुदानित शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांनाही निवडणूक ड्युटी लावण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. कायद्याने आणि नियमांनुसार अशा शिक्षकांवर निवडणूक कामाची जबाबदारी टाकता येत नसताना देखील प्रशासनाने सरसकट नोटीसा पाठवून गोंधळ उडवून दिला आहे. या नोटीसमुळे अनेक महिला व पुरूष शिक्षकांना खुलासा सादर करण्यासाठी महापालिका कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागले.

निवडणुक काळात निर्माण झालेला सावळा-गोंधळ शिक्षकांच्या माथी मारला जात आहे. नाहक त्यांना वेठीस धरले जाते. चूकीच्या पध्दतीने शिक्षकांना दिले गेलेल्या नोटीसा प्रशासनाने मागे घ्यावे. निवडणूक काळात फक्त 20 टक्के शिक्षक घ्यावे व इतर विभागातून कर्मचारी वर्ग उपलब्ध करावेत, अशी मागणी अहिल्यानगर माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...