Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजन...म्हणून चरसी दीपिका पादुकोण हॅशटॅग होतोय व्हायरल

…म्हणून चरसी दीपिका पादुकोण हॅशटॅग होतोय व्हायरल

मुंबई | प्रतिनिधी

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासादरम्यान उघडकीस आलेल्या ड्ग्स कनेक्शनचा तपास एनसीबीकडून केला जात आहे. या प्रकरणी आता अनेक बड्या कलाकारांची नावे समोर येऊ लागली आहेत.

- Advertisement -

दीपिका पादुकोणचेही नाव यामध्ये आले असून आज सकाळपासून ट्विटरवर चरसी दीपिका पादुकोण असा हशटग व्हायरल झाला असून ७५ हजार पेक्षा अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

दीपिकाचे नाव आल्यानंतर पती रणवीर सिंगचा चेहरा कसा झाला असेल इथपासून दीपिकाचे मिम्सपर्यंत सोशल मीडियात सध्या धुमाकूळ घालताना दिसून येत आहेत.

ड्रग्सप्रकरणी आतापर्यंत श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या कलाकारांचे नाव आल्यानंतर बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिकाचेही तपासादरम्यान नाव समोर आल्याने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेच एनसीबीला मिळालेल्या एका व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्सच्या खरेदी-विक्रीची चर्चा केली जात असल्याचे समोर आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Accident : समृद्धी महामार्गावर अपघात; दोन ठार, २ जखमी

0
वावी | वार्ताहर | Vavi समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) झालेल्या अपघातात (Accident) दोन जण ठार (Killed) झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली...