Saturday, July 27, 2024
Homeदेश विदेशमहिला कुस्तीपटूंच्या आरोपांप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल

महिला कुस्तीपटूंच्या आरोपांप्रकरणी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

कथित लैंगिक अत्याचार प्रकरणी (Alleged Sexual Assault) भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अडचणी वाढत आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आता मोठी कारवाई केली आहे.

- Advertisement -

कुस्तीपटूंच्या मोठ्या (Wrestler’s Protest) आंदोलनानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल (Chargesheet Filled) केले आहे. त्यामुळे आता लवकरच त्यांना शिक्षा देखील होणार असल्याचे म्हटले जातेय.

या आरोपपत्रात म्हटले आहे की, सहा आघाडीच्या कुस्तीपटूंच्या तक्रारींवरील तपासाच्या आधारे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ, विनयभंग आणि पाठलाग करणे यांसारख्या गुन्ह्यांसाठी खटला चालवला जाऊ शकतो.

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार माहिती समोर आली आहे की, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण चरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत. १३ जूनच्या आरोपपत्रात कलम ५०६ ( धमकी देणे), ३५४ (महिलेचा विनयभंग करणे), ३५४ अ (लैंगिक छळ) आणि ३५४ डी (पाठलाग) सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर एका प्रकरणात ब्रिजभूषणसिंह यांच्याकडून सतत छळ सुरु असल्याचेही सांगण्यात आले आहे.

विधान परिषदेच्या ‘त्या’ १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली

सहापैकी दोन प्रकरणांमध्ये ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कलम ३५४, ३५४अ आणि ३५४ डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम ३५४ आणि ३५४ अ अंतर्गत ब्रिजभूषण यांना ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात येते. दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या दोन एफआयआरमध्ये अनेक गंभीर आरोपांचा समावेश आहे.

एफआयआरमध्ये व्यावसायिक मदतीच्या बदल्यात सेक्सुअल फेव्हर मागण्याच्या किमान दोन प्रकरणांचा उल्लेख आहे. या आंदोलनात साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह देशातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. गेल्या दोन महिन्यांपासून न्याय मागत असलेल्या कुस्तीपटूंना आता अखेर न्याय मिळण्याची शक्यता आहे.

Accident News : भीषण अपघात! भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी

न्याय मिळत नसल्याने त्यांनी जंतरमंतर ते नवीन संसद भवनपर्यंत मोर्चा काढला होता. यावेळी नवीन संसद भवनाचे उद्घाटन सुरू असताना बाहेर रस्त्यावर कुस्तीपटूंवर लाठीचार्च करण्यात आला. तसेच त्यांचे आंदोलन जंतरमंतर येथून देखील बंद पाडण्यात आले होते. अशात आता ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याविरोधात (लैंगिक छळ) ३५४ अ, (धमकी देणे) कलम ५०६, (पाठलाग करणे)३५४ डी आणि (विनयभंग) ३५४ सारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या