Wednesday, November 4, 2026
Homeक्राईमनऊ वर्षांपासून दोषारोपपत्र न्यायालयात दाखलच नाही

नऊ वर्षांपासून दोषारोपपत्र न्यायालयात दाखलच नाही

निवृत्त पोलीस अंमलदारावर गुन्हा || पोलीस निरीक्षकांची फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर न करता त्यासंबंधीची मूळ कागदपत्रे स्वतःकडे ठेवल्याचा तसेच ती नष्ट केल्याचा गंभीर आरोप निवृत्त पोलीस अंमलदारावर करण्यात आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, निवृत्त पोलीस अंमलदार दगडू बाबाजी शेरकर (रा. तराळवाडी, ता. पारनेर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तोफखाना पोलीस ठाण्यात 2013 मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 481/2013 अन्वये भारतीय दंड विधान कलम 385, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. गोगावले यांनी केला होता. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस अंमलदार दगडू शेरकर याच्याकडे होता. शेरकर याने तपास पूर्ण करून 24 नोव्हेंबर 2017 रोजी दोषारोपपत्र क्रमांक 147/2017 अन्वये दोषारोपपत्राची स्थळप्रत पोलीस ठाण्यात जमा केली. त्यानंतर हा गुन्हा पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरून कमी करण्यात आल्याची नोंद आहे. मात्र, संबंधित दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्याचा कोणताही पुरावा अथवा कोर्ट केस क्रमांक पोलीस अभिलेखात आढळून आला नाही.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील क्रिमिनल रिट याचिका क्रमांक 975/2026 च्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार या गुन्ह्याच्या अभिलेखाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी दोषारोपपत्र पोलीस ठाण्यातून न्यायालयात दाखल झाल्याची नोंद नसल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. फिर्यादीनुसार, 24 नोव्हेंबर 2017 पासून 2 नोव्हेंबर 2026 पर्यंत संबंधित गुन्ह्याचे मूळ दोषारोपपत्र आणि कागदपत्रे न्यायालयात सादर करून कोर्ट केस क्रमांक घेणे, तसेच फिर्यादीला न्याय मिळवून देणे हे शेरकर यांचे कायदेशीर कर्तव्य होते. मात्र, गुन्ह्यातील आरोपींविरूध्द पुरावा म्हणून ही कागदपत्रे न्यायालयात वापरली जाऊ नयेत, आरोपींना फायदा व्हावा आणि त्यांना शिक्षेपासून वाचविता यावे, या उद्देशाने त्यांनी ही कागदपत्रे स्वतःकडे ठेवली किंवा नष्ट केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूकीत विखे-थोरात-गडाखांचा ‘सहकार विकास’ सुसाट

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू असणार्‍या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख...