Wednesday, March 26, 2025
Homeदेश विदेशचार्टर प्लेन महामार्गावर कोसळलं, १० जणांचा मृत्यू; धक्कादायक व्हिडीओ आला समोर

चार्टर प्लेन महामार्गावर कोसळलं, १० जणांचा मृत्यू; धक्कादायक व्हिडीओ आला समोर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

खासगी चार्टर विमान (Charter Plane Crashed)रस्त्यावरील वाहनांवर कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या अपघातामध्ये १० जणांचा मृत्यू (10 People Killed)झाल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या विमानात २ फ्लाइट क्रू मेंबर्ससह एकूण ६ लोक होते. हे विमान लांगकावी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून () टेक ऑफ करून ‘सुलतान अब्दुल अजीज शाह’ विमानतळावर उतरणार होते. मात्र काही तांत्रिक बिघाड झाल्याने हे विमान दुर्घटनग्रस्त झाले.

एका हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर येऊन आदळल्याने या विमानाचा भीषण स्फोट झाला आणि आगीचे लोट उसळले. दुसऱ्या वाहनांच्या पार्किंग कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य कैद झाले आहे. या अपघातात रस्त्यावरील दुसऱ्या लेनमध्ये असेलले वाहन थोडक्यात वाचले असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दरम्यान, मलेशियाच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने एक निवेदन जारी करत सांगितले की, सबांग एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवरचा चार्टर प्लेनशी दुपारी २.४७ वाजता पहिला संपर्क झाला. या विमानाला २.४८ मिनिटांनी उतरवण्याची मंजुरी देण्यात आली. मात्र कंट्रोल टॉवरला पहाटे २.५१ वाजता घटनास्थळावरून धूर निघताना दिसला. या घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, विमान रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांवर कोसळले. विमान वाहनांवर कोसळल्याने काही जण जखमीही झाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...