Wednesday, June 26, 2024
Homeधुळेचार्‍याआड दारूची तस्करी केली उघड

चार्‍याआड दारूची तस्करी केली उघड

धुळे dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

शिरपूर तालुक्यातील बोराडी शिवारातून चार्‍याच्या आड (under cover of fodder) होणारी दारूची तस्करी (Liquor smuggling) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकाने उघडकीस (exposed) आणली. चार अंधरात पसर झाला. मात्र वाहनासह राज्यात प्रतिबंधित असलेल्या साडेनऊ लाखांची बिअर व हिस्कीचा साठा जप्त करण्यात आला. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी चालक, मालकावर गुन्हा नोंद झाला आहे.

शिरपूर तालुक्यातील बोराडी- मालकात्तर रस्त्याने बोराडी गावशिवारातून एका चारचाकी वाहनातून दारूची अवैधपणे वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे शिरपूर विभागाचे निरीक्षक एस.एस. हांडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकास आज दि.18 रोजी पहाटे चार वाजता बोराडी-मालकात्तर रस्त्यावर बोराडी गावात सापळा लावला. तेव्हा समोरून संशयित वाहन (क्र.एमएच 18 बीजी 5819) हे येत असल्याचे दिसताच त्यास थांबविण्याच्या इशारा केला.

तेव्हा त्या वाहनाच्या चालकाने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. अंधाराचा फायदा घेत चालक पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता प्रथम सुक्या चार्‍याच्या गोण्या दिसून आल्या. गोण्या बाजूला करून तपासणी केली असता माउंट बिअरच्या 500 मि.लि.च्या महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या व मध्यप्रदेश राज्यात निर्मिती व विक्री करिता असलेले एकूण 1 हजार 440 टीन मिळाले. तसेच रॉयल ब्ल्यू व्हिस्कीच्या 180 मि.लि.च्या एकूण 1 हजार 920 बाटल्या व वाहन असा एकूण 9 लाख 41 हजार 600 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी फरार वाहन चालकसह मालकाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर विभागाचे निरीक्षक एस.एस.हांडे, दुय्यक निरीक्षक सागर चव्हाण, गणेश जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.एस.गोवेकर व जवान शांतीलाल देवरे, गोरख पाटील, केतन जाधव, प्रशांत बोरसे, हेमंत पाटील, मनोज धुळेकर, के.एम.गोसावी, दारासिंग पावारा तसेच वाहन चालक रवींद्र देसले, निलेश मोरे यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास निरीक्षक एस.एस.हांडे हे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या