Wednesday, April 30, 2025
Homeधुळेधुळ्यात पाठलाग करीत महिलेची सोनपोत ओरबाडली

धुळ्यात पाठलाग करीत महिलेची सोनपोत ओरबाडली

धुळे । dhule । प्रतिनिधी

धुमस्टाईल चोरट्यांनी दुचाकीस्वार महिलेचा (woman) पाठलाग (Chasing) करीत 14 ग्रॅमची मंगलपोत (Sonpot scratched) ओरबाडून नेली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

याबाबत प्रियंका धिरज छाजेड (वय 35 रा. प्लॉट नं. 62 रा.क्षिरे कॉलनी, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्या दि.6 एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास दवाखान्यातून दुचाकीने घरी जात होत्या. त्यादरम्यान दुचाकीस्वार दोन अनोळखी इसमांनी त्यांचा पाठलाग केला.

प्रियंका छाजेड यांच्या घरासमोरच दोघांनी त्यांची 42 हजारांची 14 ग्रॅमची पोत जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला.आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : ३० एप्रिल २०२५ – लोकांची साथ आवश्यक

0
सर्व प्रकारचे प्रदूषण वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न केला जात असल्याचे सरकारकडून वेळोवेळी सांगितले जाते. तथापि असे प्रयत्न लोकांच्या इच्छाशक्तीशिवाय प्रभावी...