Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र'इंडिया' शब्द बदलावर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...

‘इंडिया’ शब्द बदलावर संभाजीराजेंनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

जालना | Jalna

मागच्या आठवड्यात जालना (Jalna) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservetion) आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजावर लाठीचार्ज करण्यात आला. तेव्हापासून राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात बंद पुकारण्यात आले, आंदोलने झाली.

- Advertisement -

आगामी G-20 परिषदेसाठी देशांना पाठवण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत (President Of Bharat) असे लिहिण्यात आले आहे. यावरुन आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यावरुन काँग्रेसने (Congress) भाजप आणि केंद्र सरकारवर (Central Government) टीका केली आहे.

मोदी सरकारने ‘इंडिया’चे नाव बदलले?; काँग्रेस नेत्याने ट्वीट करत व्यक्त केला संताप

जालना येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलना देखील छत्रपती संभाजीराजे यांनी भेट दिली. या संदर्भात मनोज जरांगे यांच्याशी त्यांनी संवाद साधला. “मनोज पाटील यांच्या आंदोलनाला मी अनेकदा भेट दिली आहे. त्यांच्या मागण्यासंदर्भात मराठा समाजाची जी भूमिका असेल ती माझी असेल, सरकारच्या समितीला मी काही मुद्दे सुचवले होते” असे संभाजी राजे म्हणाले.

G-20 ची बैठक ९ ते १० सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील प्रगती मैदानावर होणार आहे. या बैठकीच्या डिनरला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनातून निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आल्या आहेत. सरकारने निमंत्रण पत्रिकेत देशाचे नाव बदलल्याचा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे. सरकारने निमंत्रण पत्रिकेत INDIA ऐवजी BHARAT लिहिल्याचा आरोप जयराम यांनी केला आहे.

Maharashtra Rain Update : राज्यातील ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तर छत्रपती संभाजीराजे यांनी मात्र, या निर्णयाचे स्वागत केले आहे. इंडिया शब्द बदलून भारत करणार असेल, तर काही चुकीचे नाही, असे छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटले आहे. पुढे ते असे म्हणाले की, तुम्हाला आरक्षण मिळावायचे असेल, तर वेगवेगळे पॅरामीटर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मागास म्हटलेले नाही.

पहिल्यांदा मराठा समाजाला आयोगाने मागास ठरवायला हवे. दुर्गम आणि दुर्बल भागातील लोकांना ५० टक्क्याच्यावर आरक्षण देता येते. अन्यथा केंद्राला बदल करावा लागेल. क्युरेटीव्ह पिटीशन अगोदरच टाकायला हवे होते. हा राज्याचा प्रश्न आहे. निजामाने मराठ्यांना कुणबी केले होते. मराठवाड्यातल्या कुणब्यांना आरक्षण द्यावे, असे देखील संभाजीराजे म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या