नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नक्षल्यांचा गड समजल्या जाणाऱ्या छत्तीसगडमधील बीजापूर आणि दंतेवाडात सुरक्षा दलाने मोठे ऑपरेशन सुरु केले आहे. सुरक्षा दलांनी नक्षलींना टार्गेट केले आहे. दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये २२ नक्षली ठार केले आहे. बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे पोलिस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत बीजापुर जिल्हा राखीव गार्ड (डीआरजी)च्या एका जवानाने वीरमरण पत्करले आहे. चकमकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून, संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
बीजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गंगालूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४० ते ४५ नक्षलवाद्यांना जवानांनी घेरले होते. गुरुवारी सकाळी सुरक्षा दलाने नक्षलीविरोधात मोठे मोहीम सुरु केली. सुरक्षा दलाच्या टीमने विजापूर आणि दंतेवाडाच्या गंगालूर भागात ऑपरेशन सुरु केले. यावेळी नक्षली आणि सुरक्षा दलात चकमक सुरु झाली. दोन ऑपरेशनमध्ये २२ नक्षली ठार झाले आहे. सुरक्षा दलाने विजापूरमध्ये १८ तर कांकेरमध्ये ४ नक्षलींना ठार केले. ही कारवाई देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. या चकमकींमध्ये सुरक्षा दलांचे जवान सुरक्षित असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
चकमक संपल्यानंतर घटनास्थळी १८ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. तसेच, मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक हत्यारे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत बीजापुर डीआरजीचे एक जवान शहीद झाले आहेत. या भागात अजूनही काही नक्षलवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
गंगालूर परिसरातील तोडका एंड्री जंगलात ही चकमक झाली. बीजापुर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचे मोठे तळ असल्याचे मानले जाते. मात्र, आज झालेल्या मोठ्या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा फटका बसला आहे. संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सुरक्षादलांचे ऑपरेशन अद्याप सुरू आहे. नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा