Monday, June 15, 2026
HomeनगरAhilyanagar : श्रीक्षेत्र चौंडी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल

Ahilyanagar : श्रीक्षेत्र चौंडी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल

सभापती शिंदे यांच्याकडून निर्णयाचे स्वागत व नगरवासियांतर्फे आभार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याने येत्या तीन वर्षात कामे पूर्ण होऊन श्रीक्षेत्र चौंडी एक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावरुपास येईल, असा विश्वास विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजीच्या जन्मत्रिशताब्दीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवित आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा न्यायप्रिय राज्यकारभार, प्रजाहितदक्षता, आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे त्यांनी केलेले पुन:निर्माण आणि 18 व्या शतकातील त्यांचे सांस्कृतिक पुनरुत्थानाचे कार्य सर्वांना चिरस्फुर्तीदायी असल्याचे सभापती शिंदे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

सभापती शिंदे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारची मंत्रीपरिषद बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधून 6 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी म्हणजे श्रीक्षेत्र चौंडी येथे पार पडली. या बैठकीत राज्यातील मंदिरांचा जीर्णोध्दार करण्यासाठी 5 हजार 500 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. त्यानुसार उप मुख्यमंत्री पवार यांनी चौंडी येथील विकास आराखड्यासाठी 681 कोटींच्या खर्चास नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिल्याचे जाहिर केले आहे. यामुळे श्रीक्षेत्र चौंडी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास येईल.

श्रीक्षेत्र चौंडीचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता पुरातत्वीय जाण असलेल्या व्यक्ती आणि संस्थांकडूनच विकास आराखड्यातील कामे 31 मे 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेले वैद्यकीय महाविद्यालय तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव येथील सभागृह इमारत उभारणी यास देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फडणवीस सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयांबद्दल सर्व संबंधितांचे श्रीक्षेत्र चौंडीचे भूमिपुत्र आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मातृकुलाकडून नववे वंशज महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती शिंदे यांनी अभिनंदन करून आभार मानले आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...