Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारपोलीस दलातर्फे जिल्हयात १५ ठिकाणी चेकपोस्ट स्थापन

पोलीस दलातर्फे जिल्हयात १५ ठिकाणी चेकपोस्ट स्थापन

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

आगामी सण उत्सवांच्या पार्श्‍वभुमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे १५ ठिकाणी चेक पोस्ट तयार करण्यात आले असून ८ अधिकारी व ३६ पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नंदुरबार जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण/उत्सवांच्या काळात किरकोळ कारणांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन शांतता भंग करण्याच्या विचारात असणारे समाजकंटक व गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा या उद्देशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी खबरदारी म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत आंतरजिल्हा चेक पोस्ट स्थापन केले आहेत.

जिल्ह्यातील शहरांमध्ये येण्याचे ठिकाण व बाहेर पडण्याचे ठिकाण याबाबत आढावा घेवून जिल्ह्यांतर्गत व गुजरात/मध्यप्रदेश राज्यांच्या सिमेलगत नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस ठाणे अंतर्गत १५ चेक पोस्ट स्थापन करुन त्याठिकाणी एकुण ८ पोलीस अधिकारी व ३६ शस्त्रधारी पोलीस अंमलदार तैनात करण्यात आले आहेत.

शहरात येणार्‍या व शहरातून जाणार्‍या सर्व लहान मोठ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार आहे. सदरचे चेक पोस्ट हे २४ तास तैनात राहणार आहेत.

आगामी काळात साजरे होणार्‍या सण/उत्सवांच्या काळात स्थापन करण्यात आलेले चेक पोस्ट असे- नंदुरबार शहर- साक्री नाका, कोरीट नाका, बायपास उड्डाणपुल (शहादाकडे जाणार्‍या रस्त्यावर),

उपनगर पोलीस ठाणे- नळवा नाका, धानोरा नाका (खांडबाराकडे जाणार्‍या रस्त्यावर), नंदुरबार तालुका पोलीस ठाणे- ठाणेपाडा नाका, नवापूर बेडकी नाका, विसरवाडी-खांडबारा चौफुली, शहादा पोलीस ठाणे- दरा फाटा, सारंगखेडा-अनरदबारी नाका,

म्हसावद पोलीस ठाणे- खेडदिगर नाका, धडगांव पोलीस ठाणे- भुशा नाका, काकरपाटी नाका, अक्कलकुवा पोलीस ठाणे- मोलगी रोड नाका, तळोदा पोलीस ठाणे – कुकरमुंडा फाटा नाका.

दि.१४ जून २०२३ रोजी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील म्हसावद-धडगांव रस्त्यावर रामपूर गावाच्या फाट्यावर रोडावर चेकपोस्टवर नाकाबंदीदरम्यान विरसिंग वनकर पावरा (वय-२१, रा.चिखली ता.धडगांव), नानशा जहॉंगीर पावरा (वय-१९, रा.बोरी ता. धडगांव) व

एक अल्पवयीन मुलगा हे त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये गुरांना अतिशय निर्दयतेने कोंबून पाय व मान बांधून गैरकायदेशीरपणे वाहतूक करतांना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून २३ लाख ०२ हजार रुपये किमतीचे २६ गुरे व ०३ वाहन असा मुद्देमाल हस्तगत करुन त्यांच्याविरुध्द् प्राण्यांना निर्दयतेने वागविणे,

प्राणीसंरक्षण (सुधारणा) अधिनियम, मोटार वाहन कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन आरोपी व मुद्देमाल म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पोलीस अंमलदार दिपक न्हावी, किरण मोरे, अभिमन्यू गावीत यांनी केली आहे.

जिल्हा पोलीस दलातर्फे उभारण्यात आलेल्या चेक पोस्टच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी भेट देवून, नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करतांना नागरीकांना विनाकारण त्रास होणार नाही. तसेच काही संशयास्पद मिळून आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी याबाबत उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देवून मार्गदर्शन केले. तसेच नाकाबंदीचे ठिकाणी अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या