दिल्ली | Delhi
यावर्षी भारतातून ऑस्करमध्ये दाखल झालेला गुजराती चित्रपट ‘छेलो शो’ (द लास्ट फिल्म शो) चा बालकलाकार राहुल कोळी याचे निधन झाले. तो फक्त १० वर्षांचा होता.
राहुल रक्ताच्या कर्करोगाशी गेले अनेक दिवसांपासून झुंज देत होता होता पण अखेर त्याची ती झुंज अपयशी ठरली. राहुलचे वडील उदर्निवाहासाठी ऑटो चालवता तर आर्थिक स्थिती जेमतेम असल्यामुळे वेळेत आवश्यक ते उपचार राहुलचे पालक करु शकले नाही याची त्यांना खंत आहे.
‘छेल्लो शो’ चित्रपटात सहा बाल कलाकारांनी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात राहुलनं मनु ही भूमिका साकारली. मनु हा रेल्वे सिग्नलमॅनचा मुलगा असतो. प्रमुख भूमिका साकारणाऱ्या बाल कलाकाराचा तो मित्र असतो. १४ ऑक्टोबर रोजी ‘छेल्लो शो’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा एक गुजराती चित्रपट असून याचे दिग्दर्शक पॅन नलिन आहेत.
चित्रपटाची कथा एका ग्रामीण भागातील नऊ वर्षाच्या मुलाभोवती फिरते ज्याचे चित्रपटावर अफाट प्रेम असते. ऋचा मीना, भावेश श्रीमली, परेश मेहता और टिया सबेश्चियन यांनी देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे इंग्रजी शीर्षक ‘लास्ट फिल्म शो’ असे आहे.