Monday, April 28, 2025
Homeक्रीडाआयपीएल१३ : चेन्नई दुसऱ्या विजयासाठी सज्ज

आयपीएल१३ : चेन्नई दुसऱ्या विजयासाठी सज्ज

मुंबई | Mumbai

ड्रीम इलेव्हन आयपीएल २०२० चा चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात खेळवला जाणार आहे.

- Advertisement -

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर करण्यात येणार आहे. सामना शारजा मैदानावर होणार आहे. चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे युवा फलंदाज ऋतुराज गायकवाड करोनामुक्त झाला असून, लवकरच तो संघात दाखल होण्याची शक्यता आहे.

चेन्नई संघाने आपल्या सलामी सामन्यात मुंबई इंडियन्स संघावर मात करून विजयी सलामी दिली होती. आता राजस्थान रॉयल्स विरुद्ध आपली विजयी मोहीम अशीच कायम राखण्यासाठी धोनी सेना सज्ज झाली आहे.

पहिल्या सामन्यात अंबाती रायडू आणि फाफ डू प्लेसिस यांनी संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली होती. शेन वॉटसन रविंद जडेजा, मुरली विजय यांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यांना आपली कामगिरी सुधारण्याची संधी मिळणार आहे.

तर गोलंदाजीत सॅम करण , लुंगी इंगिडी पियुष चावला चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याची गरज आहे.

– सलील परांजपे, नाशिक

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...