Tuesday, June 25, 2024
Homeक्रीडाQualifier 1 : चेन्नई, दिल्ली आज भिडणार

Qualifier 1 : चेन्नई, दिल्ली आज भिडणार

दुबई | Dubai

- Advertisement -

आयपीएल २०२१ मध्ये (IPL 2021) आज पहिला क्वालिफायर (Qualifier) सामना दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर होणार आहे…

सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर सायंकाळी ७:३० वाजता करण्यात येणार आहे. साखळी सामन्यांमध्ये दिल्ली (DC) आणि चेन्नई (CSK) संघाच्या कामगिरीवर नजर टाकल्यास दिल्ली संघाची कामगिरी अधिक सरस ठरली आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाने १४ सामन्यांमध्ये १० विजय आणि ४ पराभवांसह २० गुणांनी अव्वल स्थान गाठले आहे. तर चेन्नई संघाला ९ विजय आणि ५ पराभवांसह १८ गुणांनी दुसरे स्थान पटकावता आले आहे.

आजच्या सामन्यात विजय मिळवून दिमाखात अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी दोन्ही संघांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. आजच्या सामन्यात विजय संपादन करून अंतिम फेरी दुसऱ्यांदा गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज आहे.

तर बाद फेरीच्या सामन्यांमध्ये मोस्ट कंसिस्टंट संघ म्हणून जाणल्या जाणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स तब्बल ९ वेळेस अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सज्ज आहे.

आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरी गाठण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गत ४ सामन्यांमध्ये दिल्लीने चेन्नईला पराभूत करून चेन्नईवर निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

या पराभवाची सर्रास परतफेड करण्यासाठी चेन्नई सज्ज आहे. तर चेन्नईवर मात करून यंदाच्या हंगामात विजयी हॅट्रिक नोंदवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज आहे.

अखेरच्या तीन साखळी सामन्यांमध्ये चेन्नईला पंजाबकिंग्ज (PBKS), दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स (RR) संघाकडून पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे चेन्नई संघ आजच्या सामन्यात दिल्लीविरुद्ध कशी कामगिरी करतो यावर सामन्याचा निकाल अवलंबून आहे.

दिल्लीने अखेरच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे विजयी मार्गावर परतण्यासाठी पंत ॲण्ड कंपनी काय रणनीती तयार करते? ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सलिल परांजपे, नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या