Monday, April 28, 2025
Homeक्रीडाचेन्नईचा हैदराबादवर विजय

चेन्नईचा हैदराबादवर विजय

दुबई । वृत्तसंस्था

सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नईने हैदराबादवर २० धावांनी विजय मिळवला.

- Advertisement -

नाणेफेक जिंकून महेंद्रसिंग धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्पर्धेत पहिल्यांदा चेन्नईला आधी फलंदाजीची संधी मिळाली. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत १६७ धावा केल्या होत्या. त्यात शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या जोडीने ८१ धावा केल्या . धोनीच्या चेन्नई संघाने स्पर्धेतील तिसरा विजय साकारला.

हैदराबादच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली.१६८ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचे फलंदाज झटपट बाद झाले. १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून अनुभवी केन विल्यमसनने एकाकी झुंज देत अर्धशतक (५७) ठोकले, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली.

कर्णधार डेव्हिड वॉर्नर (९), मनिष पांडे (४), विजय शकंर (१२), प्रियम गर्ग (१६) हे फलंदाज स्वस्तात माघारी परतले. जॉनी बेअरस्टोने चांगली सुरूवात केली होती पण तोदेखील २३ धावा काढून बाद झाला. केन विल्यमसनने मात्र खेळपट्टीवर तळ ठोकत एकाकी झुंज दिली, पण त्याला इतर कोणत्याही फलंदाजाची साथ मिळून शकली नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...