Monday, March 31, 2025
Homeनगरधनादेश न वटल्याने 6 महिन्यांची साधी कैद

धनादेश न वटल्याने 6 महिन्यांची साधी कैद

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्ज घेतलेले कर्जदार अनिल तानाजी खैरे यांनी कर्जाच्या परतफेडीपोटी पतसंस्थेला दिलेला 20 लाख रुपयाचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगाव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं. 306/2019 दाखल केला होता. त्यामध्ये चौकशीअंती आरोपी अनिल तानाजी खैरे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने न्यायाधीश भगवान पंडित यांनी आरोपीस 6 महिन्यांची साधी कैदेची शिक्षा ठोठावली.

- Advertisement -

तसेच फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस 25 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला. नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा 6 महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी अ‍ॅड. एस. डी. काटकर यांनी काम पाहिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 MI vs KKR : आज मुंबई-कोलकाता लढत; MI विजयाचे...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (सोमवारी) सायंकाळी मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट...