Friday, May 16, 2025
Homeनगरधनादेश न वटल्याने डॉक्टरला दोन लाखांचा दंड, दोन महिने कारावास

धनादेश न वटल्याने डॉक्टरला दोन लाखांचा दंड, दोन महिने कारावास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

धनादेश न वटल्या प्रकरणी शहरातील एका डॉक्टरला दोन लाख रूपये दंड व दोन महिने कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे.

सदर खटल्यात फिर्यादी हिरा केशवदास मोत्यानी यांनी डॉ. किशोर नरहरी पाथरकर (कायनेटिक चौक) यांना उधारीवर औषधे दिली होती. दिलेल्या औषधांच्या थकबाकीपोटी डॉ. पाथरकर यांनी मोत्यानी यांना दिलेला 1 लाख 39 हजार पाचशे रुपयांचा धनादेश वटला नाही. याबाबत मोत्यानी यांनी डॉ. पाथरकर यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती.

सदर खटल्यावर सुनावणी होऊन नुकतेच अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आय. एम. नाईकवाडी यांनी डॉ. किशोर नरहरी पाथरकर यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अ‍ॅक्ट 1981 चे कलम 138 अन्वये दोषी धरून दोन महिने कारावास व दोन लाख रुपये नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याबाबतचा आदेश दिला आहे. तसेच नुकसान भरपाई रकमेचा भरणा सात दिवसांत न केल्यास सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात फिर्यादीतर्फे अ‍ॅड. मनीष पी. गांधी यांनी कामकाज पाहिले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi : साईदर्शनासाठी येणार्‍या भक्तांसाठी 5 लाखाचे विमा कवच

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पालखी घेऊन तसेच विविध खासगी अथवा सार्वजनिक वाहनांनी मोठ्या संख्येने भक्त येत असतात. अशा साईभक्तांसाठी ते घरातून निघून...