Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा बोलबाला, पहिल्या दिवशी जमवला करोडोंचा...

Chhaava Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘छावा’चा बोलबाला, पहिल्या दिवशी जमवला करोडोंचा गल्ला

मुंबई । Mumbai

अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ऐतिहासिक चित्रपट ‘छावा’ हा 2025 मधील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच खूप चर्चा निर्माण केली होती. चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ शिगेला पोहोचली होती.

- Advertisement -

चित्रपटासाठी बरीच आगाऊ बुकिंग झाली होती. अखेर 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला ‘छावा’ चित्रपटगृहात दाखल झाला. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केलीये. ‘छावा’ने (Chhaava Movie) रिलीजच्या पहिल्या दिवशी किती कमाई केली, ते आपण पाहू या.

या सिनेमात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने (Rashmika Mandana) महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तसेच अभिनेता अक्षय खन्ना (Akshay Khanna) औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. हा सिनेमा रिलीज होताच पहिल्या दिवशी करोडो रुपयांचा गल्ला जमवला.

विकी कौशलने आपल्या अभिनयाच्या जोरावर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने तब्बल 31 करोड रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी मिळालेल्या घवघवीत यशामुळे हा सिनेमा नक्कीच इतर सिनेमांचे रेकॉर्ड मोडू शकतो.

महत्त्वाचे म्हणजे विकी कौशलचा पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा छावा हा पहिलाच सिनेमा आहे. यापूर्वी त्याच्या उरी आणि बॅड न्यूज या सिनेमाने अनुक्रमे 9 आणि 8 कोटींची कमाई केली होती. परंतु, ‘छावा’ ने त्याच्या दोन्ही सिनेमांचा रेकॉर्ड मोडल्याचे पाहायला मिळत आहे.

तसेच या सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंगमध्येच तब्बल 5 लाख तिकीट विक्री (Chhaava advance booking collection) झाली होती. यातूनच सिनेमाने 13.70 कोटी कमाई झाली होती. बजेटबाबत बोलायचे झाले तर या सिनेमाचे बजेट 130 कोटी आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी तर मॅडॉक फिल्म्स बॅनरअंतर्गत दिनेश विजान यांनी निर्मिती केली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सर्वप्रथम शिर्डीत पोहोचले खरातचे ‘डर्टी पिक्चर्स’

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik स्वतःला अवतार मानणार्‍या अशोक खरातचे काळे साम्राज्य उद्ध्वस्त होण्यामागे कोणत्याही बाहेरील यंत्रणेपेक्षा त्याच्या आतल्या गोटातील माणसांनी दाखवलेले धाडस निर्णायक ठरल्याचे उघड झाले...