Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : "आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी..."; छगन भुजबळांचा रोख नेमका कुणाकडे?

NCP Crisis : “आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी…”; छगन भुजबळांचा रोख नेमका कुणाकडे?

मुंबई | Mumbai

अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत (NCP) उभी फुट पडली असून राज्याच्या राजकरणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या फुटीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले असून आज शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मुंबईत स्वतंत्र्य बैठका पार पडत आहेत. या बैठकीत दोन्ही गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले…

- Advertisement -

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पहिल्याच बैठकीत शरद पवार गटावर हल्लाबोल केला. यावेळी भुजबळ म्हणाले की, शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. पण त्यांना पक्षातील काही बडव्यांनी घेरले आहे. साहेब, या बडव्यांना दूर करा. आम्हाला आवाज द्या. आम्ही तुमच्यासोबत येतो. आपण सरकारमध्ये राहून महाराष्ट्राच्या विकासाचे काम करू असे आवाहन भुजबळ यांनी शरद पवार यांना केले.

NCP Crisis : भुजबळांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; ‘या’ तारखेला घेणार सभा

पुढे ते म्हणाले की, शरद पवार साहेब तुमच्याबद्दल आदर आहे. तुम्हाला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. वसंतदादांनाही वाईट वाटले असेल. मी तुमच्याकडे आलो, तेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि माँ साहेबांना असेच वाईट वाटले होते. धनंजय मुंडेंना तुम्ही पक्षात घेतले, तेव्हा काका असलेले गोपीनाथ मुंडे आणि बहीण असलेली पंकजा यांच्या डोळ्यातही असेच अश्रू आले होते. असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.

Rain Update : राज्यातील ‘या’ भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून ‘यलो अलर्ट’

अजित पवारांनी बंड करत भाजप-शिंदे गटाच्या साथीने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. वर्षभरापूर्वी शिंदे गटाने शिवसेनेतून बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. तसेच काहीसे आता राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी केले आहे. शिवसेनेतील बंडाच्या वेळी जे-जे घडले ते-ते सगळे पुन्हा एकदा महाराष्ट्र राष्ट्रवादीच्या (Maharashtra NCP) बंडानंतर अनुभवत आहे.

सिन्नर : गुळवंचमधील संशयिताची आत्महत्या

यानंतर शिंदे गटाने (Shinde Group) बंड केल्यावर आमच्या विठ्ठलाच्या आजूबाजूच्या बडव्यांमुळे आम्ही वैतागलो होतो, असे म्हटले होते. त्यानंतर आता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेलेल्या छगन भुजबळांनीही आमचा विठ्ठल बडव्यांनी घेरला आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या आजूबाजूला असलेले ते बडवे नेमके कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या