Wednesday, May 22, 2024
Homeनगरघर फोडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली

घर फोडण्याची सुरुवात शरद पवारांनी केली

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

पावसात भिजून सहानुभूती मिळवणार्‍या शरद पवार (Sharad Pawar) यांनीच घरं फोडण्याची सुरुवात केली, अशी टीका (Criticism) कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी आज संगमनेर (Sangamner) येथे केली.

- Advertisement -

नाशिक (Nashik) हुन पुण्याकडे (Pune) जाताना मंत्री भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांचे तालुक्यातील रायतेवाडी फाटा (Rayatewadi Phata) येथे काही वेळ थांबले होते. यावेळी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकमधील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांमधून सामाजिक कार्याची दिशा मिळते, त्यामुळे सकाळी या दोन्ही ठिकाणी जावून आता आपण पुण्याकडे जात असल्याचे ते म्हणाले.

भंडारदरातील पाणीसाठा 60 टक्के

भारतीय जनता पक्ष (BJP) आपल्या सत्तेसाठी दुसर्‍यांचे घर फोडीच असल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला होता. याबाबत विचारले असता घरे फोडण्याची सुरुवात पवार कुटुंबीयांनी केली असा आरोप (Accusation) त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव न घेता केला. पावसात भिजून काही काळ सहानुभूती मिळते मात्र ही सहानुभूती कायमस्वरूपी नसते असेही भुजबळ म्हणाले. याप्रसंगी समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बदली झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे सुटेनाजिल्हा परिषदेत आज अनुकंपा भरती

- Advertisment -

ताज्या बातम्या