Saturday, May 17, 2025
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या तोतया आयकर...

Chhagan Bhujbal: मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या तोतया आयकर अधिकाऱ्याला अटक

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकचे माजी पालकमंत्री आणि माजी अन्न नागरी पुरवठा मंत्री आमदार छगन भुजबळ यांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून छगन भुजबळ यांचे स्विय सहाय्यक संतोष गायकवाड यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी उच्चशिक्षित तरुणाला नाशिक गुन्हे शाखा युनीट क्र. १ च्या पथकाने करंजाळी येथे सापळा रचत रंगेहाथ अटक केली आहे.

- Advertisement -

छगन भुजबळांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्या पथकात मी असून धाडीत मी सहकार्य करेल अशी आरोपीने बतावणी केली होती. आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. पैसे न दिल्यास कारवाई करण्याची धमकी त्याने गायकवाड यांना दिली होती. मात्र स्वीय सहाय्यक यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. त्यानंतर पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव यांनी कारवाईचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत गायकवाड यांना गुजरातच्या धरमपूर येथे बोलावून आरोपीस पैसे देण्यासाठी आणण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी डमी नोटा आणि काही खरी रक्कम पंच साक्षीदारांच्या माध्यमातून आरोपीकडे देण्याचे ठरवले. यानंतर नाशिक पोलिसांनी तात्काळ कुठून फोन आला आणि कुणी केला याचा तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत त्यांनी आरोपीचा शोध घेतला.

त्यानुसार, नाशिकच्या गुन्हे शाखा युनीट क्र. १ च्या पथकाने कंरजाळी येथे सापळा लावून पोलीसांनी संशयित आरोपी राहुल दिलीप भुसारे (वय २७, रा. करंजाळी, ता. पेठ) यास रंगेहाथ अटक केली. आरोपीकडून एक होंडा शाईन मोटारसायकल, मोबाईल फोन, ५०० रुपयांच्या ६० खऱ्या नोटा, तसेच खेळण्यातल्या नोटांचे १५ बंडल (एकूण अंदाजे ८५,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल) जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Kedarnath helicopter crash : केदारनाथमध्ये इमर्जन्सी लँडिंगदरम्यान हेलीकॉप्टर कोसळलं, पहा Video

0
केदारनाथमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास केदारनाथमध्ये एक हेलिकॉप्टर क्रॅश लँडिंग करताना दिसले. हे हेलिकॉप्टर एम्स ऋषिकेशच्या वैद्यकीय सेवेसाठी वापरले...