Sunday, July 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi Swearing Ceremony : राष्ट्रवादीकडून भुजबळांना मंत्रिपदाची संधी?

PM Modi Swearing Ceremony : राष्ट्रवादीकडून भुजबळांना मंत्रिपदाची संधी?

दोघांच्या वादात तिसऱ्याचा लाभ? अजित पवार गटाच्या नेत्यांची दादांकडे मागणी

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएचे सरकार (NDA Government) आज देशात स्थापन होणार आहे. संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडणार असून नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पीएमओ कार्यालयाकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना फोन करण्यात आले आहेत.

यामध्ये महाराष्ट्रातून भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही खासदाराला मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही.अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात रस्सीखेच पाहायला मिळत असून या दोघांमध्ये मंत्रीपदावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना केंद्रीय मंत्रिपदासाठी संधी द्या अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जर असे झाल्यास दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. नुकतेच काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या निवासस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झाले होते. यावेळी त्याठिकाणी राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे उपस्थित होते.

यावेळी मंत्रीपदावरून पटेल आणि तटकरे यांच्यात वाद झाल्यामुळे तो वाद मिटविण्यासाठी फडणवीस सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आल्याचे बोलले जात आहे. फडणवीस जवळपास अर्धा ते एक तास तटकरे यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. यावेळी त्यांनी पटेल आणि तटकरे यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या दोघांमधील वाद मिटत नसल्यास भुजबळांना मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी मागणी अजित पवारांकडे केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, छगन भुजबळांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास त्यांना राज्यसभेतून (Rajyasabha) खासदार म्हणून निवडून जावे लागणार आहे. कारण महाराष्ट्रात महायुतीच्या कोट्यातील राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. त्यामुळे भुजबळ केंद्रात मंत्री झाल्यास त्यांची राज्यसभेवर वर्णी लागू शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या