Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : ...म्हणूनच प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई - भुजबळ

Video : …म्हणूनच प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई – भुजबळ

मुंबई | प्रतिनिधी

आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरुद्ध ईडी सुडापोटी कारवाई करत असल्याची टीका राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केली. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा पडल्याचे वृत्त मी पाहिले आहे. सरनाईक हे सातत्याने कंगना आणि अर्णबच्या प्रकरणात महाराष्ट्राच्या बाजूने बोलत होते म्हणूनच त्यांच्यावर ईडी कडून छापा टाकला गेला असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले…

- Advertisement -

आज राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात जनता दरबार कार्यक्रमावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, विरोधीपक्षातील एखादा नेता जो व्यक्ती केंद्रसरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे. मी बोललो म्हणून माझ्यावर केसेस दाखल केल्या. पवार साहेब निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस पाठवली जात आहे.

त्यामुळे सुडापोटी ही कारवाई केली जात असल्याचे मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे मतही त्यांनी मांडले.

जे स्वप्नरंजन करुन घेत असेल आणि त्यात त्यांना आनंद मिळत असेल तर त्यांचा आनंद आपण का भंग करावा भाजपाला सरकार पडण्याची स्वप्ने पडत असतील तर त्यांनी जरूर स्वप्ने पहावी असा टोला देखील भुजबळ यांनी यावेळी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या