Sunday, May 26, 2024
Homeनाशिकमंत्री भुजबळ यांना धमकीचा मॅसेज

मंत्री भुजबळ यांना धमकीचा मॅसेज

नाशिक | प्रतिनिधी

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना व्हाट्सअप वर धमकीचा मेसेज केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.१३) राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या मोबाईलच्या व्हाट्सअप क्रमांकावर ९०७५०१५८७५ या क्रमांकाहून धमकीचा मॅसेज आला. यावरून युवक राष्ट्रवादी शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरीष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या