मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज मुंबईमधील (Mumbai) सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत, हे राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याला माहित नसल्याने संभ्रम वाढला होता.
हे देखील वाचा : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर; कारण अद्याप गुलदस्त्यात
तब्बल तीन तासानंतर भुजबळ हे सिल्व्हर ओकवरुन बाहेर पडले त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीबाबत माहिती दिली.यावेळी भुजबळांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांची भेट घ्यायला गेलो असल्याचे सांगितले. तसेच, या भेटीपूर्वी अजित पवारांशी काहीही चर्चा केली नव्हती. पंरतु, शरद पवारांची भेट घ्यायला जाण्यापूर्वी पक्षातील एका नेत्याला सांगितले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा : शरद पवारांसोबत भेटीत काय चर्चा झाली? भुजबळांनी पत्रकार परिषदेत सगळचं सांगितलं
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “मी घरून निघताना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्याशी चर्चा केली होती. मी शरद पवार यांना भेटायला जात आहे. माझ्याजवळ असलेली कागदपत्रे त्यांना देणार आहे, असे मी त्यांना सांगितले होते. त्यानंतर प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी मला जा असे” सांगितल्याचे भुजबळ यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Chhagan Bhujbal : “त्या दिवशी बारामतीतून फोन आला आणि…”; भुजबळांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
दरम्यान, शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “राज्यात ओबीसींना आरक्षण देण्याचं काम शरद पवारांनी केले आहे. मात्र आता राज्यातील काही जिल्ह्यांत फार स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. तर काही लोक ओबीसी, धनगर यांच्यासारख्या दुकानात जायला बघत नाहीत, अशी परिस्थिती आहे. राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून राज्यात शांतता निर्माण करण्याची तुमची जबाबदारी आहे, याची आठवण मी पवारांना करून दिली”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
.