Saturday, July 27, 2024
HomeनाशिकChhagan Bhujbal : ...तेव्हा बबनराव घोलपांची निष्ठा कुठे होती?; छगन भुजबळांचा घणाघात

Chhagan Bhujbal : …तेव्हा बबनराव घोलपांची निष्ठा कुठे होती?; छगन भुजबळांचा घणाघात

नाशिक | Nashik

शिवसेना उपनेते बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिल्यानंतर वर्षभरापूर्वी भुजबळांचा सेना प्रवेश आपण रोखल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता भुजबळांनी घोलप यांच्या गौप्यस्फोटावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मी कधीही शिवसेना प्रवेशासाठी कुणाकडे गेलो नाही. आज जे पक्षावर निष्ठा दाखवत आहेत त्यांनीच १९९१ साली शिवसेनेतून काँग्रेसमध्ये (Congress) जाण्यासाठी ज्या ३६ आमदारांनी (MLA) सह्या केल्या त्यात त्यांची सही सर्वात वर होती असे सांगत घोलपांवर शरसंधान साधले…

- Advertisement -

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट झाले मालामाल; दोन महिन्यात मिळाले ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न

वर्षभरापूर्वी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार होते, मात्र मी दिल्लीत असताना ही गोष्ट समजली आणि त्यानंतर लागलीच दिल्लीहून मुंबई (Mumbai) गाठत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि चर्चेअंती भुजबळांचा प्रवेश रोखल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते बबनराव घोलप यांनी केला होता. याबाबत छगन भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मी आणि माझी मुले यांनीही कधीही आम्हाला शिवसेनेत प्रवेश करायचा आहे, असे कुणालाही म्हटलेलो नाही. कुणाकडे आम्ही गेलो नाही. मधले काही कार्यकर्ते चर्चा करत असतील तर मला माहित नाही. कारण नसतांना त्यांनी हा विषय काढला. त्यांना शिवसेना सोडून दुसर्‍या पक्षात जायचे आहे त्यांनी जावे. पंरतु ते निष्ठावान असल्याचे दाखवतात. १९९१ साली शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जाण्यासाठी ज्या ३६ जणांनी सह्या केल्या त्यात घोलपांची स्वाक्षरी सर्वात वरती होती. त्यामुळे त्यांनी निष्ठेच्या गोष्टी करू नये असा टोला भुजबळांनी यावेळी लगावला.

Shivsena Crisis : १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी एका आठवड्यात सुनावणी घ्यावी; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

तर ओबीसींचे दहा टक्के आरक्षण वाढवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहूल शेवाळेंनी सभागृहात केली आहे. याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. फडणवीस यांनी जो कायदा केला त्यात १२ ते १३ टक्के तरतूद मान्य केली होती. पण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अडचण निर्माण झाली. मराठा समाजाला आरक्षण द्या ही मागणी आम्ही पूर्वीपासून करत आहोत. पंरतु, कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता ते देण्यात यावे. त्यांना देखील अडचणी आहेत. शिक्षणाच्या अडचणी, आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे त्यांना वेगळे आरक्षण द्यावे ही शेवाळे यांची मागणी योग्य आहे.

WhatsApp ने आणलं नवीन फिचर; आता एकाचवेळी करता येणार ‘इतक्या’ युजर्सचा ग्रुप कॉलिंगमध्ये समावेश

ओबीसी समाजानेही (OBC Community) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडे जर चर्चेची मागणी केली तर ते चर्चा करतील. अर्थात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही वारंवार हे स्पष्ट केले आहे की, आम्ही कोणाच्याही आरक्षणाला धक्का लावणार नाही. पंरतु, ओबीसी समाजामध्ये एक काळजी निर्माण झाली आहे की, काय होईल, काही उलट सुलट होईल का पण सरकार सांगत आहे तसे काही होणार नाही, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Nashik Accident News : नाशिक-चांदवड महामार्गावरील कार-कंटेनर अपघातातील मृतांची नावे आली समोर

तसेच नांदेड (Nanded) येथील घटनेबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले की, आत्महत्या करून किंवा दगडफेक करून हे प्रश्न सुटणार नाही. हे सर्व प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजे. याकरीता सर्व पक्ष आणि महाराष्ट्र सरकार तयार आहे. सण उत्सवांचे दिवस आहेत त्यामुळे मराठा समाजाच्या पदाधिकार्‍यांनी ही आंदोलने थांबवली पाहिजे आणि उत्सवांच्या काळात वितुष्ठ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे आवाहनही यावेळी भुजबळ यांनी केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Rain Alert : राज्यासाठी पुढील चार दिवस महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस बरसणार, IMD कडून अलर्ट जारी

- Advertisment -

ताज्या बातम्या