Tuesday, March 25, 2025
Homeनगरपालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरच छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत मारहाण

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोरच छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत मारहाण

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढावे या मागणीचे निवेदन देणारे छात्रभारतीचे कार्यकर्ते अनिकेत घुले यांना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेरुन धक्काबुक्की करत मारहाण केली. यामुळे संतापाची लाट उसळली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेर नगरपालिका येथे बैठकीसाठी आले असताना छात्रभारतीच्यावतीने निवेदन देण्यासाठी अनिकेत घुले व इतर विद्यार्थी हे पुढे सरसावले.

- Advertisement -

मात्र महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी घुले व त्याच्या सहकार्‍यांना ना.विखे पाटील व आ. अमोल खताळ यांच्यासमोर धक्काबुक्की करत मारहाण केली. हे वृत्त समजताच तालुक्यामध्ये संतापाची लाट उसळली. यानंतर घुले व त्याचे सर्व सहकारी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी गेले. मात्र प्रशासनाने टाळाटाळ केल्याने त्यांनी ठिय्या मांडला. संबंधित घटनेची छायाचित्रे व चित्रफीत सर्वत्र व्हायरल होत असून नावानिशी तक्रार दाखल करावी, अशी मागणी छात्रभारती संघटनेने केली आहे.

दरम्यान, हे सर्व पदाधिकारी मंत्री व आमदार खताळ यांच्याबरोबर दिवसभर शासकीय अधिकार्‍यांसमवेत फिरत आहेत. विशेष म्हणजे पोलीस प्रशासन त्यांचे संरक्षण करत आहे हा कुठला न्याय? अशी तीव्र प्रतिक्रिया अनिकेत घुले याने व्यक्त केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...