निफाड । प्रतिनिधी Niphad
छत्रपतींचे वंशज असलेल्या व महाराष्ट्रातील जनतेला ज्यांचा अभिमान व स्वाभिमान म्हणून ज्यांच्याकडे महाराष्ट्र आशेने बघतो. असे कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या विनंतीला व आवाहनाला निफाड तालुक्यातील जनतेने व मतदार राजाने मान देऊन 20 नोव्हेंबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार तसेच स्वराज्य पक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व अंगीकृत शेतकरी संघटना यांच्या वतीने परिवर्तन महाशक्तीच्या वतीने उमेदवारी करणारे निफाड पंचायत समिती व पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती गुरुदेव द्वारकानाथ कांदे यांच्या बॅट या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावे व निफाड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे व प्रामुख्याने शेतकर्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकशाहीच्या पवित्र मंदिर असलेल्या विधान भवनात विकासाची चौफेर बॅटिंग करण्यासाठी संधी देत मतदारराजाला मतदान करण्याचे आवाहन स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशवराव गोसावी यांनी केले आहे.
निफाड तालुक्यातील स्वराज्य पक्षाच्या वतीने झंझावती दौरा करणार्या केशवराव गोसावी यांनी निफाड तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत छत्रपती संभाजी राजे यांचे विचार तालुक्यातील जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न केला. व घराघरात स्वराज्य पक्षाच्या वतीने गुरुदेव कांदे यांच्यासाठी छत्रपती यांचे ध्येयधोरणे सांगत महाराष्ट्रात खर्या अर्थाने स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा देऊन मतदार राजाचे मतपरिवर्तन करण्यासाठी परिवर्तन महाशक्तीला विजयी करण्याचे आववाहन छत्रपती राजेच्या वतीने केशवराव गोसावी यांनी केले आहे. तर त्यांच्या या प्रचार दौर्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे
छत्रपतींचे वारसदार म्हणून अत्यंत जागरूकपणे त्यांनी वारसा चालविला आहे त्यामुळे त्यांच्या आवाहनाला किंवा विनंतीला नाहीतर त्यांच्या आदेशाला मान देऊन प्रचार दौर्यात नागरिकांनी सांगितले या प्रचार दौर्यात चांगल्या पद्धतीने नागरिकांनी प्रतिसाद देत परत एकदा महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपतींच्या विचारांचा महाराष्ट्र घडवण्यासाठी नागरिकांचा या प्रचार सभेला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. या प्रचार सभेसाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशवराव गोसावी नाशिक शहराध्यक्ष शामभाऊ गोसावी, निफाड तालुका अध्यक्ष अशोकराव आहेर, स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.