Tuesday, March 25, 2025
Homeनगरखासदार नीलेश लंके यांना खंडपीठाची नोटीस; काय आहे प्रकरण?

खासदार नीलेश लंके यांना खंडपीठाची नोटीस; काय आहे प्रकरण?

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात (Ahmednagar Loksabha Constituency) निवडून आलेले खासदार नीलेश लंके (MP Nilesh Lanke) यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका प्रतिस्पर्धी उमेदवार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात (Chhatrapati Sambhajinagar Bench) दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असून न्यायमुर्ती किशोर संत यांनी खासदार लंके यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. खासदार लंके यांना निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकेतून (Petitions) करण्यात आली आहे. यावर पुढील सुनावणी आता 2 सप्टेंबरला होणार आहे.

- Advertisement -

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 ते 45 केंद्रावर आक्षेप घेतला आहे. तसेच या केंद्राची मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे. याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे डॉ. विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. तसेच खोटा प्रचार करून विजय मिळविला आहे, त्यामुळे त्यांची निवड रद्द ठरवावी, अशी मागणी करणारी निवडणूक याचिका माजी खासदार डॉ. विखे पाटील यांनी दाखल केली आहे. खंडपीठाने याचिका (Petitions) दाखल करून घेतली आहे. त्यावर खासदार लंके यांना नोटीस (Notice) बजावण्यात आली आहे. डॉ. विखे पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. व्ही. डी. होन आणि ए. व्ही. होन बाजू मांडत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...