Saturday, May 4, 2024
HomeUncategorizedउन्हाच्या झळ्या झाल्या असाह्य

उन्हाच्या झळ्या झाल्या असाह्य

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सर्वांनाच सहन करावा लागतो. कधी गारपीट तर कधी उन्हाचे चटके अशा विचित्र वातावरणातून मराठवाड्याला मार्गक्रमण करावे लागत आहे. मराठवाड्यातील काही भागांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत असताना आज सोमवारी वातावरण बदलून गेले असून आर्द्रता कमी झाल्याने तापमानात कमालीची वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ३९ अंशांवर स्थिरावला आहे.

- Advertisement -

आजचा पारा ३९ अंशांवर पोहचला आहे. आर्द्रता कमी झाल्यामुळे उन्हाचा चटका तीव्रतेने जाणवत आहे. यामुळे दुपारी रस्त्यावरील वाहतूकही तुरळ झाली आहे. मागच्या महिन्यापासून अवकाळी पाऊस व आभाळ ढगांनी व्यापलेले राहत आहे. यातच वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटांमध्ये अधूनमधून अवकाळी पावसाचा शिडकावा होत आहे. त्यामुळे सकाळी व रात्री गारवा तर दुपारी तीव्र उन्हाचे चटके जाणवत आहेत, असे किचित्र वातावरण तयार झाले आहे. आज तापमानात २ अंशाने वाढ झाली आहे. अशातच सोमवारी सकाळपासून उन्हाचा चटका जाणवू लागला. उन्हापासून बचाव करण्यासाठी रुमाल, उपरणे, डोळ्यांसाठी गॉगल्सचा वापर करताना नागरिक दिसून आले. शिवाय रस्त्यावरील वाहतूक विरळ झाल्याचे दिसले. तापमान गेल्या २ दिवसांच्या तुलनेत वाढले आहे. आजचे तापमान ३९ अंशांवर पोहचले असून, शनिवारी ३७.७, शुक्रवारी ३८.७ गुरुवारी ३८.८ अंशांवर पोहचले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या