Wednesday, November 20, 2024
HomeUncategorizedतत्पर वीज सेवेत छत्रपती संभाजीनगर अव्वल

तत्पर वीज सेवेत छत्रपती संभाजीनगर अव्वल

छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar

वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीज पुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) परिमंडळाने नवीन वीज जोडणी तत्परतेने देण्यासह खंडित वीज पुरवठा, बिलिंग व ग्राहकांच्या इतर तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात राज्यात आघाडी घेतली आहे.

- Advertisement -

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) परिमंडळात मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रलंबित वीज जोडणी देणे, ग्राहकांच्या वीज पुरवठ्याच्या तक्रारी, बिलिंगच्या तक्रारी, इतर तक्रारी निर्धारित कालावधीत निकाली काढणे तसेच बितरण रोहित्र वेळेत बदलणे या पाच मुद्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. डॉ. केळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) परिमंडळात मिशन मोडवर काम करत वीज जोडण्या देण्यासह तक्रारींचा निपटारा करण्यात आला. 

छत्रपती संभाजीनगर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वर्गवारीतील प्रलंबित असलेल्या ६०३१ अर्जापैकी ५५०६ ग्राहकांना दहा दिवसांत नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. याबरोबरच खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्यात येत आहे. दहा दिवसात वीज पुरवठा बंदच्या १६५७ पैकी १४९४ तक्रारींचे निवारण केले. बिलिंगच्या २५६० पैकी २३६२ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. तर इतर सेवाविषयक ६०७ पैकी ४२७ तक्रारी सोडवण्यात आल्या. संभाजीनगर परिमंडळात सर्व तक्रारींचे प्रलंबन अवघ्या एका दिवसावर आले आहे. महावितरण (Mahavitran) मधील इतर परिमंडलांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वात कमी आहे. तसेच ग्राहकांना वीज पुरवठा करणारे वितरण रोहित्र नादुरुस्त झाल्यास ते तातडीने बदलण्यातही छत्रपती संभाजीनगर परिमंडळाने आघाडी घेतली आहे.

साडेतीन हजार वीजचोरी उघड 

मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी वीज चोरीविरोधात नियमित कारवायांबरोबरच जूनमध्ये विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. ज्या विद्युत वाहिनीवर वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे. त्या भागात दतर भागातीत्ल कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानुसार परिमंडळातील प्रत्येक शाखेत जूनमध्ये पहिल्या व तिसर्‍या आठवड्यात धडक मोहीम राबवण्यात आली. यात वीज चोरीच्या ३३१९ प्रकरणांत कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास दोन कोटी रुपयांची वीज चोरीची बिले आकारण्यात आली आहेत. ही बिले न भरल्यास वीज चोरांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

वीज चोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरण (Mahavitran) ने केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या