Sunday, September 8, 2024
Homeनगरधक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य

धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आक्षेपार्ह वक्तव्य करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 5) रात्री नगर शहरात घडली आहे. दरम्यान, सदरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या.

- Advertisement -

पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या युवकाला अर्धा तासात नगर शहरातून ताब्यात घेतले. अरमान नईम शेख रा. मुकुंदनगर असे या युवकाचे नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी युवकाने आक्षेपार्ह भाषेत बोलून ते रेकॉर्ड केले. सदरची रेकॉर्ड केलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली. सदरची क्लिप व्हायरल होताच संबंधित युवकाला एका व्यक्तिने फोन केला असता त्या युवकाने पुन्हा आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या.

दरम्यान सदरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक ओला यांना मिळाली. त्यांनी एलसीबीच्या पथकाला तपास करण्याच्या सूचना दिल्या. निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण करत सदरची ऑडिओ क्लिप करणाऱ्या अरमान शेख याला अर्धा तासात नगर शहरातून ताब्यात घेतले. त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होताच संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. संबंधित युवकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या