Wednesday, January 7, 2026
HomeनगरShrirampur : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भाजी मंडईत बसविणे बेकायदेशीर

Shrirampur : छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भाजी मंडईत बसविणे बेकायदेशीर

शिवाजी चौकातील बांधकाम विभागाची परवानगी दडपून ठेवणारांवर कारवाई करावी- प्रकाश चित्ते

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसविण्याची बांधकाम विभागाची परवानगी असतानाही, पुतळा भाजी मार्केटमध्ये घाईघाईत बसविण्याचा प्रयत्न केला गेला, तो बेकायदेशीर आहे, त्यामुळे पुतळा बसविणार्‍या व बांधकाम विभागाची परवानगी दडपून ठेवणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी केली आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी भाजपाचे शशिकांत कडूस्कर, राजेंद्र कांबळे, संजय पांडे, सुरेश सोनवणे, अभिजीत कुलकर्णी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

श्री. चित्ते म्हणाले, पालकमंत्री विखे पाटील यांनी बाहेरून श्रीरामपुरात निवडलेले फिल्ड ऑफिसर यांचे कारनामे लपविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नावाचा गैरवापर केला, त्याचा आम्ही निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे, अशी अनेक वर्षांपासूनची आमची मागणी होती. ना. विखे व महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते शिवाजी चौकात महाराजांचा पुतळा बसविण्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यावेळी बांधकाम विभागाचे ना हरकतचे प्रमाणपत्र आले होते. ना. विखे व रामगिरी महाराज यांच्या हस्ते झालेला तो कार्यक्रम कायदेशीर होता.

YouTube video player

छत्रपती शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी बांधकाम विभागाने 1 जानेवारी 2024 रोजीच्या पत्रानुसार आधीच परवानगी दिली होती. तरीही हा पुतळा शिवाजी चौकात न बसवता नेहरू भाजी मार्केट परिसरात बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. जो पुतळा उभारण्यात आला, तो हिंदू लोकांना मान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवाजी चौकात बसण्यासाठी बांधकाम विभागाची परवानगी असताना, ती परवानगी लपविण्यात आली. बेकायदेशीरपणे पुतळा बसविण्यास कारणीभूत असलेल्या सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचार्‍यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी श्री. चित्ते यांनी केली.

यावेळी राजेंद्र कांबळे म्हणाले, शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड यांनी आम्हाला ‘जर सार्वजनिक बांधकाम खात्याने परवानगी दिली, तर हा पुतळा शिवाजी चौकातच बसविण्यात आमचा पाठिंबा राहील’ असा शब्द दिला होता. आता आम्ही शहराध्यक्ष छाजेड यांना आवाहन करतो की, शिवाजी चौकात पुतळा बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचा ना हरकत दाखला आलेला आहे. आता हा पुतळा शिवाजी चौकात बसविणार का? असा सवालही कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

बेकायदेशीरपणे पुतळा बसविणार्‍या व बांधकाम विभागाची परवानगी दडपून ठेवणार्‍या अधिकारी, पदाधिकारी व कर्मचार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आम्ही लवकरच प्रशासनाकडे देणार असल्याचे प्रकाश चित्ते यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...