Sunday, June 23, 2024
Homeनगरछत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी कारवाई करावी; आंबेडकवादी संघटनांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी कारवाई करावी; आंबेडकवादी संघटनांची मागणी

टाकळीभान l वार्ताहर

- Advertisement -

तालुक्यातील टाकळीभान ग्रामपंचायतीच्या कारभार्‍यांनी वरीष्ठांचा आदेश न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा फ्लेक्स बोर्डवरील देखावा ग्राम सचिवालयाच्या इमारतीवर टांगल्याने आराध्य दैवताचा अवमान झाला असून विटंबना होण्याची भिती व्यक्त करीत मनमानी कारभार करणार्‍या सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन भिमशक्ति, भिमगर्जना, वंचित बहुजन आघाडी, बहुजन क्रांती संघटना यांच्यावतीने प्रांताधिकारी, श्रीरामपूर यांना देण्यात आले आहे.

अल्टीमेटम संपला…तर पुणे ते मुंबई लाँग मार्चही काढू !

या विविध संघटनांच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, टाकळीभान येथे सर्वधर्मिय नागरीक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. येथील ग्रामपंचायतीचे कारभारी सरपंच पती यशवंत रणनवरे, उपसरपंच संतोष खंडागळे व ग्रामविकास अधिकारी यांनी वरीष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळ्याचा डिजीटल फलक ग्रामसचिवालयाच्या प्रशासकिय इमारतीवर टांगवला आहे. ही अशोभनिय घटना आहे. छत्रपतींसारख्या युगपुरुषाच्या प्रतिमेला उघड्यावर टांगुन ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्ताकडुन रात्री अपरात्री प्रतिमेची विटंबना होण्याचा धोका संभवतो. तसे झाल्यास कायदा सुव्यवस्थेचाही प्रश्‍न निर्माण होवू शकतो. तसेच विविध जाती धर्माचे लोक प्रशासकिय इमारतीवर त्यांच्या महापुरुषांचे फलक लावण्याची मागणी करु शकतात. हे संविधानिक नाही. त्यामुळे छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याचा फलक इमारतीमध्ये विराजमान करण्यात यावा, जेणेकरुन आराध्य दैवताची दररोज पुजा आर्चा करता येईल व दैवत समोर असल्याने त्यांच्या आदर्शावर वाटचाल करीत निस्वार्थ सेवा करता येईल. याबाबत काळजीपूर्वक लक्ष घालून शिवरायांच्या झालेल्या अवमानाचा निषेध म्हणुन ग्रामपंचायतीचा कारभार करणार्‍या या तिघांवर योग्य ती कारवाई करावी, असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

निवेदनावर भिमशक्ति संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर पठारे, भिमगर्जना सामाजिक संघटनेचे संस्थापक फिरोजभाई पठाण, राज्य अध्यक्ष शिवा साठे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष किशोर रणपिसे, बहुजन क्रांती संघटनेच्या महीला जिल्हाध्यक्ष अनिता तडके यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या