नाशिक | प्रतिनिधी Nasik
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.
- Advertisement -
यावेळी माजी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार डॉ. राहुल आहेर, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिकमध्ये सिंहस्थ तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यामुळे दौर्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.