Tuesday, July 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौर्‍यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौर्‍यावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उद्या शुक्रवारी (दि. १०) नाशिक दौर्‍यावर येतआहेत.

नाशिकमध्ये श्री स्वामीनारायण कन्व्हेन्शन सेंटर हॉल, आडगाव नाका, पंचवटी येथे भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकार्‍यांची संघटनात्मक बैठक व संवाद कार्यक्रम होणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाने प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर दौरा करीत असून, याअंतर्गत उद्या नाशिकला येत आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत नाशिक येथे उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक होणार आहे.

या बैठकीत आगामी निवडणुकांची विभागनिहाय रणनीती आखण्यासाठी प्रमुख पदाधिकार्‍यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. यावेळी ते मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांतील राजकीय समीकरणे, उमेदवारांची तयारी, स्थानिक पातळीवरील मुद्दे आणि प्रचार धोरण यावर सविस्तर चर्चा करणार असल्याचे समजते.

ताज्या बातम्या

Rahata : जायकवाडीचा साठा 58.52 टक्क्यांवर

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पावसाचे मध्यम स्वरूपाचे आगमन होत आहे. धरणातील विसर्ग नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने घटविण्यात आले आहेत. गोदावरीत काल सायंकाळी...