पाचोरा । प्रतिनिधी
पाचोरा-भडगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारासाठी भडगाव येथे आयोजित सभेत बोलताना सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी सांगितले की किशोर पाटील यांना निवडून दिले तर हा मतदारसंघ दत्तक घेण्याचे वचन दिले आहे. येथील एमआयडीसीत उद्योग आणून बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचनही यानिमित्ताने आपल्याला देतो असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले.
खा.डॉ.श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणात आयोजित सभेत बोलत होते. डॉ.श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यावर साडेसात हजार रूपये टाकण्यात आले आहेत. महायुतीचे सरकार आल्यावर या लाडकी बहीणांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 2100 रूपये पडणार आहेत.
उलट जे शिंदे साहेबांवर टीका करतात त्यांनी कोरोना काळात खिचडीत सुध्दा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे ते काय बोलतील? मुख्यमत्र्यांचा प्रवास हा रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा राहीला आहे. त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांची जाण आहे. जे लोक बाळासाहेबांची मिमिक्री करायचे आज त्यांना पक्षात घेऊन खांद्यावर बसविण्याचे काम काहीजण करत आहे. यावेळी व्यासपीठावर भाजपच्या गुजरात मधील निंबायत मतदार संघाच्या आ.संगीताबेन पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, भाजपचे विधानसभा संयोजक अमोल पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील, प्रवक्ते प्रदिप देसले, डॉ.प्रियंका पाटील शहरप्रमुख बबुल देवरे, तालुकाप्रमुख संजय पाटील, सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, सुरेंद्र मोरे, शशिकांत येवले पी.ए.पाटील, युवा नेते सुमित पाटील, युवासेनेचे जितेंद्र जैन, लखीचंद पाटील, आबा चौधरी विकास पाटील, प्रवक्ते उल्हास आवारे, नंदु सोमवंशी, इमरान अली सैय्यद, वासिम मिर्झा, आनंद जैन, एकलव्य संघटनेचे धर्मा बाविस्कर, दशरथ मोरे, जहागिर मालचे आदि उपस्थीत होते.