Sunday, November 17, 2024
Homeनंदुरबारपुढील महिन्यात मुख्यमंत्री नंदुरबारात

पुढील महिन्यात मुख्यमंत्री नंदुरबारात

नंदुरबार । प्रतिनिधी nandurbar

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासन आपल्या दारी मोहिमेच्या विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) जिल्हा दौर्‍यावर येणार असून या कार्यक्रमात जिल्ह्यातील सुमारे 85 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन आहे. सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमासाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे नियोजन करावे, अशा सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) यांनी दिल्या.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात शासन आपल्या दारी मोहिमेच्या आढावा बैठकीत डॉ.गावित बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मंदार पत्की (तळोदा), परिविक्षाधिन सनदी अधिकारी अंजली शर्मा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ.गावित म्हणाले, शासन आपल्या दारी मोहिमेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अधिक सुलभीकरणातून योजनेचा लाभ देण्याचा शासनाचा मानस आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 हजार लाभार्थ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात सुमारे 85 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन करताना लाभार्थ्यांची निवड, कार्यक्रम स्थळी त्यांच्यासाठी वाहतुक व्यवस्था, पेयजल अनुषंगिक बाबींचे नियोजन करण्यात यावे. या मोहिमेतून सरकारी योजनांची गतिमान अंमलबजावणी होणार असून सरकार व प्रशासन यांच्याबद्द्लचा विश्वास वाढीस चालना मिळणार आहे. गरज तिथे मदत कराताना सर्व सामान्यांशी थेट संपर्काची संधी यानिमित्ताने शासन व प्रशासनास लाभणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या